शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जुने नाशिक : एकाच कुटुंबातील तीघांचा कोरोनाने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:46 IST

नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, फकिरवाडी, चव्हाटा, बागवानपुरा, काजीपुरा, जेगवाडा, मुलतानपुरा, बुधवारपेठ, काजी गढी, नानावली, कथडा, चौकमंडई हा सगळा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा व एकमेकांना लागून आहे.

ठळक मुद्देनाईकवाडीपुरा भागात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले जुने नाशिक परिसर एकूणच ‘रेड झोन’ बनला आहे

नाशिक : शहरातील मधील नाईकवाडीपुरा या भागात कोरोनाचा अचानकपणे उद्रेक झाला. या भागातील एकाच कुटुंबातील तीघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामध्ये दोन सख्खे भाऊ आणि भावजयीचा समावेश आहे. नाईकवाडीपुरा-कुंभारवाडा भागात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या बुधवारी (दि.१०) पाच झाली.

शहराचा अत्यंत दाट लोकवस्तीचा गावठाण भाग म्हणून जुने नाशिकची ओळख आहे. या भागात अरुंद गल्लीबोळ आणि संमिश्र लोकवस्ती आहे. लहान-लहान घरे एकमेकांना अगदी लागूनच आहे. यामुळे या भागात झालेला कोरोनाचा शिरकाव जाणकारांच्यामते अधिक धोकेदायक ठरणारा असल्याचे बोलले जात आहे. नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, फकिरवाडी, चव्हाटा, बागवानपुरा, काजीपुरा, जेगवाडा, मुलतानपुरा, बुधवारपेठ, काजी गढी, नानावली, कथडा, चौकमंडई हा सगळा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा व एकमेकांना लागून आहे. सध्या नाईकवाडीपुरा भागात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले असले तरीदेखील अमरधामरोड, कुंभारवाडा, बागवानपुरा, मोठा राजवाडा, कोकणीपुरा, दुधबाजार, खडकाळी या भागातसुध्दा रुग्ण मिळून आले आहेत. यामुळे हा संपुर्ण जुने नाशिक परिसर एकूणच सध्या ‘रेड झोन’ बनला आहे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही. या भागातील नागरिकांनी खूप जास्त प्रमाणात स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची गरज असून कुठल्याहीप्रकारे स्वत:चा आजार व लक्षणे लपवून न ठेवता डॉक्टरांसोबत संपर्क साधावा तसेच आरोग्यप्रशासनाच्या सर्वेक्षण पथकाला पुर्ण सहकार्य करणे गरजेचे असल्याचे महापालिकेचे कोरोना सेलप्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.अफवांना बळी पडू नये; गैरसमज पसरवू नयेजुने नाशिक भागात कोरोना आजाराविषयीचे विविध गैरसमज पसरत आहेत; मात्र आता ही वेळ गैरसमज पसरविण्याची आणि त्यावर विश्वास ठेवून अफवांना बळी पडायची अजिबात नाही, असे पोलीस व आरोग्य प्रशासनाने म्हटले आहे. मनपा आरोग्य प्रशासनासह पोलीस प्रशासन पुर्णपणे सतर्क राहून या भागात उपाययोजनांवर भर देत आहेत; मात्र नागरिकांनीदेखील घरात थांबण्यास व स्वयंशिस्त लावून घेत आरोग्याच्या बाबतीत पाळावयाच्या सुचना गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस