शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवाड्यात जुन्या आठवणीत रमले नाशिककर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:28 IST

मातीची भांडी आजच्या विसाव्या शतकात कालबाह्य झाली... नव्या पिढीला मातीच्या भांड्यांची केवळ खेळणीतूनच ओळख... कधीकाळी स्वयंपाकापासून भोजनापर्यंत अशाच मृदभांड्यांचा वापर होत असे, हे या पिढीच्या बहुदा गावीही नसावे...सरकारवाड्याच्या पुरातन वास्तूत आबालवृद्ध नाशिककर मातीच्या गोळ्याला आकार देण्यात दंग झाल्याचे चित्र शनिवारी (दि.१८) पहावयास मिळाले.

ठळक मुद्देमातीच्या गोळ्याला आकार देत भांड्यांच्या निर्मितीचा प्रयत्न; मुलांनी रंगविल्या वस्तू

नाशिक : मातीची भांडी आजच्या विसाव्या शतकात कालबाह्य झाली... नव्या पिढीला मातीच्या भांड्यांची केवळ खेळणीतूनच ओळख... कधीकाळी स्वयंपाकापासून भोजनापर्यंत अशाच मृदभांड्यांचा वापर होत असे, हे या पिढीच्या बहुदा गावीही नसावे...सरकारवाड्याच्या पुरातन वास्तूत आबालवृद्ध नाशिककर मातीच्या गोळ्याला आकार देण्यात दंग झाल्याचे चित्र शनिवारी (दि.१८) पहावयास मिळाले.जागतिक संग्रहालय दिनाचे औचित्य साधत पुरातत्त्व विभागाच्या प्रादेशिक वस्तुसंग्रहालयाच्या वतीने शनिवारी सरकारवाडा येथे मातीची भांडी बनविण्याची कार्यशाळा मोफत आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत बालवयापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रवेश खुला होता. यामुळे आपल्या लहान मुलांना सरकारवाड्याच्या छत्राखाली आणलेल्या नाशिककरांनीसुद्धा जुन्या नाशकातील क्षीरसागर बाबा (कुंभार मामा) यांच्याकडून मातीची भांडी बनविण्याची कला शिकून घेण्याचा प्रयत्न केला. कार्यशाळेच्या प्रारंभी संग्रहालयाच्या अभिरक्षक जया वाहने यांनी उपस्थित नाशिककरांना कार्यशाळेचे उद्दिष्ट, संग्रहालय दिनाचे महत्त्व, सरकारवाड्याची माहिती आणि प्रादेशिक वस्तू संग्रहालयात जतन केलेला अमूल्य ठेवा याविषयी माहिती दिली.न्याहाळला अमूल्य ठेवामातीची भांडी बनविण्याच्या कार्यशाळेच्या निमित्ताने सरकारवाड्यात आलेल्या नाशिककर आबालवृध्दांनी येथील वस्तुसंग्रहालयामधील अमूल्य असा वारसा ‘याचि देही याचि डोळा’ न्याहाळला. पाषाण शिल्प, जैन तीर्थकारांच्या मूर्ती, हिंदू देव-देवतांच्या मूर्तींसह प्राचीन नाणी, तलवारी, ठासणीच्या बंदूकांसारखे शस्त्रांचा संग्रहित ठेवा बघून नाशिककर अवाक् झाले.

टॅग्स :Nashikनाशिकhistoryइतिहास