शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकाच्या वृद्ध पत्नीची घरकुलाची फाईल महापालिकेने केली गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 13:56 IST

नाशिक : स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेले कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केले आहेत़ चालता येत नसतानाही ही वृद्ध महिला घरकुलासाठी महापालिकेच्या वरीष्ठ अधिका-यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवते आहे़ विशेष म्हणजे महापालिकेचे अधिकारी तिची खिल्ली उडवित तुला कशाला हवे घर, ...

ठळक मुद्दे निराधार विधवा महिला : कार्यालयात खेटाघरकुल विभागातील अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा

नाशिक : स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेले कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केले आहेत़ चालता येत नसतानाही ही वृद्ध महिला घरकुलासाठी महापालिकेच्या वरीष्ठ अधिका-यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवते आहे़ विशेष म्हणजे महापालिकेचे अधिकारी तिची खिल्ली उडवित तुला कशाला हवे घर, भीक मागून खा असा सल्ला देत असल्याचे निवेदन शहीदपत्नी कमल दगडू गुरव (रा़ आंबेडकर मार्केट, सातपूर कॉलनी) यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांना दिले आहे़

मूळच्या साता-याच्या मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात सैनिक असलेले दगडू पिलू गुरव यांच्याशी कमल गुरव यांचा विवाह झाला़ आर्टिलरी सेंटरकडून पती सैन्यात असल्याची कागदपत्रेही गुरव यांच्याकडे होती़ अपत्य नसलेल्या तसेच निराधार कमल गुरव यांनी झुणका भाकर केंद्र तसेच छोटी - मोठी कामे करून आतापर्यंत कसाबसा आपला उदरनिर्वाह केला़ जिल्हाधिकारी महेश झगडे यांच्या कार्यकाळात लोकशाही दिनामध्ये माजी सैनिक पत्नी कमल गुरव यांना घरकुल मंजूर केल्याचे त्या सांगतात़ त्यासाठी सर्व कागदपत्रेही त्यांनी महापालिकेला दिली, त्यांना चुंचाळे, हिरावाडी येथे घरकुल देतो असे सांगण्यात आले़ मात्र कागदपत्रेच गहाळ झाली की केली? त्यांना अखेरपर्यंत घरकुल मिळालेच नाही़ कागदपत्रे गहाळ झाली असे सांगितले जाते, त्यांच्या पतीचे सर्व्हिस बुकही हिसकावून घेतल्याचे त्या सांगतात़

अनेक वर्षांपासून त्या घरकुलासाठी महापालिकेचे सातपूर विभागीय कार्यालय तसेच राजीव गांधी भवन या ठिकाणी खेटा मारताहेत़ विशेष म्हणजे काही रिक्षाचालक गुरव यांच्या वृद्धत्वाकडे पाहून रिक्षाचे भाडेही घेत नाहीत़ सातपूर कॉलनीत चाळीस वर्षांपासून राहत असलेल्या गुरव सध्या सातपूर कॉलनीतील भाजी मंडईत उघड्यावर राहत आहेत़ घरकुलासाठी दिलेले व गहाळ केलेले कागदपत्रे शोधून घरकुल मिळावे असे निवेदन आयुक्तांना दिले आहे़घर विकून खाऊ 

स्वातंत्र्यपूर्व काळातील शहीद सैनिकाची पत्नी असून निराधार असल्याने घरकुलासाठीची सर्व कागदपत्रे दिली आहेत़ मात्र, महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयातील तत्कालीन व विद्यमान अधिकारी आव्हाड, गवळी, राऊत, बच्छाव हे घरकुलाची चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर गाडगे महाराज मठात जाऊन रहा, तुला घर मिळणार नाही, तुझे घर आम्ही विकून खाऊ असे सांगतात़ महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनाही मी निवेदन दिले आहे़ त्यांनी तरी माझी दखल घ्यावी़- कमल गुरव, सैनिक पत्नी, आंबेडकर मार्केट, सातपूर कॉलनी 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिकWomenमहिला