शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात वृध्दाची गळा चिरुन हत्या; दीड महिन्यांत आठवा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 20:43 IST

नाशिक शहरात मागील दीड महिन्यात ही खुनाची आठवी घटना घडली आहे. पहिली घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. यानंतर मुंबईनाका, गंगापुर, सरकारवाडा, भद्रकाली, अंबड, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग खुनाच्या घटना घडल्या.

नाशिक : शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. कधी गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये दंगलीचा भडका उडतो तर कधी कौटुंबिक वादातुन एखाद्याची हत्या होते. दोन दिवसांपुर्वी भाऊबंदकीच्या वादातुन झालेल्या मारहाणीत शिंदे गावात सख्या भावाला ठार मारल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचा तपासाला गती येत नाही, तोच बुधवारी (दि.१७) शहरातील गंगापुर पोलीस ठाणे हद्दीतील आनंदवली गावात एका ७५वर्षीय वृध्दाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार संध्याकाळी उघडकीस आल्याने नाशकात जणु खुनाची मालिकाच सुरु झाली की काय अशी शंका घेतली जात आहे.गंगापुररोडवरील आनंदवली गावाच्या शिवारात राहणारे रमेश मंडलिक (७५) या वृध्दाचा संशयितांनी धारधार शस्त्राने गळा चिरल्याने मंडलिक हे जागीच ठार झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गंगापुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ श्वान पथकासह न्यायसहायक प्रयोगशाळेच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मंडलिक यांच्या मारेकऱ्यांच्या शोधात त्वरित गंगापुर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकासह गुन्हे शाखेचे पथकाला रवाना करण्यात आले.दरम्यान, नाशिक शहरात मागील दीड महिन्यात ही खुनाची आठवी घटना घडली आहे. पहिली घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. यानंतर मुंबईनाका, गंगापुर, सरकारवाडा, भद्रकाली, अंबड, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग खुनाच्या घटना घडल्या. गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत दीड महिन्यांत हा दुसरा खुन आहे. यापुर्वीही आनंदवली शिवारात मद्यपी मित्रांमध्ये वाद होऊन एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्यात दगड टाकून त्यास जागीच ठार केले होते.

टॅग्स :Murderखूनnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयSenior Citizenज्येष्ठ नागरिक