शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चाैथी शिकलेल्या आजीबाई पाच वर्षांपासून स्वयंस्फूर्तीने वाटताहेत कापडी पिशव्या

By अझहर शेख | Updated: February 1, 2024 15:49 IST

नाशिकमध्ये करत आहेत पर्यावरण जपण्याचे आर्जव

नाशिक : वयाची सत्तरी ओलांडलेल्या आजीबाईंचे पर्यावरण प्रेम वाखाण्याजोगे आहे. स्व खर्चाने कापडी पिशव्या घरी तयार करतात आणि शहरात सार्वजनिक ठिकाणी फिरून नागरिकांना त्यांचे मोफत वाटप करत विमल स्वामी-वसमतकर या आजी पर्यावरण जपण्याचे आर्जव करताना दिसतात. मागील पाच वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम स्वयंस्फूर्तीने उच्चशिक्षित सूनबाईच्या साथीने सुरू आहे.

पर्यावरण तुमच्या दारी, कापडी पिशवी तुमच्या घरी... असे सांगत ‘प्लॅस्टिक पिशवी विसरा, कापडी पिशवी वापरण्याची लाज बाळगू नका..’ असे आवाहन त्या आपल्या कडक आवाजात तरुणाईला सांगतात. समाजात पर्यावरणाविषयीच जनजागृती वाढीस लागावी, प्लॅस्टिक पिशव्यांची नागरिकांना झालेली सवय मोडावी अन् पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिक हद्दपार व्हावा, असे विमल आजींना वाटते. यामुळेच घरी लग्न कार्यात नातेवाईकांनी आहेर म्हणून दिलेल्या नव्या कोऱ्या साड्या असो किंवा शर्टपीस, पॅन्टपीस असो त्यापासून आकर्षक पद्धतीने कापडी पिशव्या तयार करत पिशवीला चांगल्या दर्जाची चेन लावून त्याचे वाटप करतात. कुठेही सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये परिसरातील भाजी बाजारात, मंदिरांमध्ये शाळांमध्ये जात आजीबाई कापडी पिशव्या लोकांच्या हाती देत पर्यावरण जपा असे आवाहन करतात.सिडको परिसरातील खुटवडनगर भागात राहणाऱ्या या आजीबाईंचा उतारवायातसुद्धा उत्साह तरूणाईला लाजवेल असाच आहे. त्या कोणाकडूनही कापड, साडया घेत नाहीत, तर त्यांच्याकडे असलेल्या साड्या व कापडाच्या माध्यमातूनच पिशव्या शिवून वाटतात. त्यांच्या या पर्यावरणपुरक जनप्रबोधनपर कृतीशील कार्याला सूनबाई शर्मिला वसतमतकर यांचीही मोलाची साथ लाभत आहे.

७,५०० कापडी पिशव्यांचे वाटप

पाच वर्षांमध्ये आजीबाईंनी तब्बल ७,५०० कापडी पिशव्या, ५ हजार कापडी पाकिटे तयार करून वाटली आहेत. तसेच ७० प्रकारच्या बी-बीयांपासून तयार केलेल्या राख्यांचेही वाटप त्यांनी केले आहेत. केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या आजीबाईं उतवारवयातसुद्धा पर्यावरणाविषयीची सजगता दाखवून जनजागृतीसाठी प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :NashikनाशिकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी