पंचवटी : नवीन आडगाव नाक्यावरील संतोष टी पार्इंट येथे पायी जाणाऱ्या वृद्धाला दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात नारायण रामचंद्र शेळके (६५) हा वृद्ध ठार झाल्याची घटना घडली. याबाबत अज्ञात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेळके हे रविवारी रात्री नवीन आडगाव नाक्यावरील संतोष टी- पॉइंट येथून रस्ता ओलांडत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने औषधोपचारासाठी आडगाव येथील डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पाथरवट लेन येथे राहणाऱ्या दिगंबर रामचंद्र शेळके यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (वार्ताहर)
वृद्धाला दुचाकीने धडक दिल्याने वृद्ध ठार
By admin | Updated: December 2, 2014 01:53 IST