शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

काळाराम मंदिर दरवाजासमोरचा वृक्ष कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 15:37 IST

पंचवटी : श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा समोर उद्यानालगत असलेला अनेक घटनांचा साक्षिदार पुरातन पिंपळ वृक्ष शनिवारी सकाळच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत व वित्तहानी झाली नाही. सदर वृक्ष काळाराम मंदिर पूर्व दरवाजाच्या बाहेर भिंतीवर कोसळला आहे. शुक्रवारी (दि. १२) झालेल्या मुसळधार पावसामुळे वृक्ष भोवती असलेला परिसर पाण्याने भिजला गेला व त्यातच झाडाचा बुंधा मोकळा केल्याने सदर झाड कोसळले.

ठळक मुद्देअनेक घटनांचा साक्षिदारबुंधा मोकळा केल्याने घडली घटना

पंचवटी : श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा समोर उद्यानालगत असलेला अनेक घटनांचा साक्षिदार पुरातन पिंपळ वृक्ष शनिवारी सकाळच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत व वित्तहानी झाली नाही. सदर वृक्ष काळाराम मंदिर पूर्व दरवाजाच्या बाहेर भिंतीवर कोसळला आहे. शुक्रवारी (दि. १२) झालेल्या मुसळधार पावसामुळे वृक्ष भोवती असलेला परिसर पाण्याने भिजला गेला व त्यातच झाडाचा बुंधा मोकळा केल्याने सदर झाड कोसळले.गेल्या काही दिवसांपासुन काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा समोरील परिसराच्या सुशोभीकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र मंदिरासमोर खोदकाम करताना जमीनीखाली चबुतरा आणि पुरातन पायऱ्या आढळून आल्याने पुरातत्व खात्याच्या सुचनेवरून सुशोभिकरणाचे काम बंद करण्यात आले आहे. राम मंदिरासमोरच लहान उद्यान असून या उद्यानात अनेक प्रकारची झाडे आहेत. उद्यानाच्या संरक्षक भिंती लगत पुरातन पिंपळवृक्ष होते. काही दिवसांपासून या परिसरात काम सुरू असल्याने रस्त्यात मध्यभागी असलेल्या पिंपळवृक्षा भोवतीचा मातीचा भर मोकळा करण्यात आला आहे. त्यातच शुक्रवारी झालेल्या पावसामुळे आजूबाजूचा परिसर पूर्णपणे भिजला गेल्याने व झाडाचा बुंधा मोकळा असल्याने सदरचा हवेच्या झोक्यात तो कोसळला. मुळात सदरचा वृक्ष रस्त्यात अडथळा ठरत होता त्यामुळे तो पडावा यासाठीच झाडाचा बुंधा मोकळा केल्याचा आरोप परिसरात राहणा-या नागरिकांनी केला आहे.श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा बाहेर असलेल्या परिसरात वृक्ष कोसळल्याची माहिती पंचवटी उद्यान विभागाला कळविण्यात आल्यानंतर उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वृक्षाच्या फांद्या बाजूला काढण्याचे काम केले काही वर्षांपूर्वी काळाराम मंदिर पूर्व दरवाजा जवळ असलेले पुरातन वटवृक्ष कोसळण्याची घटना घडली होती. 

टॅग्स :Nashikनाशिकkalaram templeकाळाराम मंदीर