तहसीलदार यांनी ओझर ग्रामपालिकेची सार्वत्रिक निवडणूक घेण्याची व निवडणूक अधिकारी म्हणून प्रशांत ए. तांबे यांची नियुक्ती केल्याची नोटीस पाठवली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या १ ते ६ वॉर्डमधील निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते ३ या वेळेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार निफाड ( हॉल ) या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. दि. ३१ डिसेंबरला प्राप्त अर्जांची छाननी करण्यात येणार असून, दि. ४ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारी माघार घेता येईल. दरम्यान, ओझर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत करण्याचा निर्णय शासनाने मागील आठवड्यातच घेतल्याने ओझरकरांनी त्याचे स्वागत केले होते. परंतु, या निर्णयाचा धुराळा बसतो ना बसतो तोच शासनाने ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याने ओझरकर संभ्रमात पडले आहेत.पिंपळगावसारखी स्थिती?बारा वर्षांपूर्वी पिंपळगाव बसवंत येथे नगर परिषद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र एक तप उलटले तरी नगर परिषद झालीच नाही. आता ओझरच्या बाबतीतही नगर परिषदेचा मुहूर्त लागलेला असतानाच ग्रामपालिकेचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने पिंपळगाव बसवंतसारखेच ओझरचेही नगर परिषदेचे घोंगडे अडकून पडणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीने ओझरकर संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:29 IST
ओझर : ओझर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असतानाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ओझरकर संभ्रमात पडले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीने ओझरकर संभ्रमात
ठळक मुद्देनगर परिषदेत रूपांतर? : तहसीलदारांकडून कार्यक्रम जाहीर