शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:46 IST

ओझर येथील २९ वर्षीय महिलेने शुक्रवारी आत्महत्या केली. याप्रकरणी मयत महिलेच्या वडिलांनी फिर्याद दाखल केल्याने तिच्या पती व दिरास ओझर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ओझरटाउनशीप : ओझर येथील २९ वर्षीय महिलेने शुक्रवारी आत्महत्या केली. याप्रकरणी मयत महिलेच्या वडिलांनी फिर्याद दाखल केल्याने तिच्या पती व दिरास ओझर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, कडू श्रावण खैरनार (वय ६३, रा. उंटवाडी सिडको नाशिक) यांची मुलगी गायत्री हिचा विवाह २४ जानेवारी २०११ रोजी बाबुलाल विठ्ठल गाडेकर यांचा मुलगा कृष्णा (रा. नगरसूल, ता. येवला) याच्याबरोबर मोठया थाटात झाला. कृष्णा हा एचएएलमध्ये कामांस असल्याने तो पत्नीसोबत काही दिवस टाउनशीपमध्ये राहत होता. त्यांना २०१५ मध्ये विहान हा मुलगा झाला. दरम्यान, कृष्णाला दारू आणि सिगारेटचे व्यसन लागले. त्यावरून नवरा-बायकोत नेहमी खटके उडत होते. अनेक वेळा कृष्णा हा गायत्रीस मारझोडही करीत असे. आज ना उद्या जावई सुधारेल म्हणून वडील गायत्रीची समजूत काढून तिला ओझरला आणून घालायचे. गायत्रीचा भाऊ संकेत हा कॅनडा येथे नोकरीस आहे. तोही बहिणीला नेहमी मदत करायचा.मला घर बांधायचे आहे त्यासाठी तुङया वडिलांकडून अडीच लाख रु पये आण म्हणून कृष्णाने जानेवारी २०१६मध्ये गायत्रीला मारझोड करून काढून दिले. याबाबत खैरनार यांनी कृष्णाचे वडील, भाऊ व सासू यांना सांगितले मात्र त्यांनी तुमच्या मुलीचीच चूक आहे असे सांगून तुमच्या मुलीला समजून सांगा किंवा फारकत घ्या, असे सांगितले. मयत गायत्रीला सासरा बाबुलाल याने तुझ्याकडे बघतो, असा दमही दिला होता. सन २०१८ला गणेशोत्सवात कृष्णाने गायत्रीला मारझोड केली. यात तिचा हात मोडला होता. १३ डिसेंबर २०१८ रोजी कृष्णाने पुन्हा मारझोड केली.पोलीस पंचनाम्यात गायत्रीने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात तिने सासू जिजाबाई, सासरे बाबुलाल, पती कृष्णा, जेठ दत्तू व दीर अमोल यांनीच मला आत्महत्या करण्यास भाग पाडले असल्याचा मजकूर आहे. तिचा मुलगा विहान यानेही वडील मम्मीला व मला नेहमी शिवीगाळ व मारहाण करीत असल्याची जबानी दिली आहे.

टॅग्स :WomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी