नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या नगरसेवकांचे राजीनाम्याचे पेव फुटले असून आधी भाजपा आणि शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. पाठोपाठ मंगळवारी (दि.१५) शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी म्हणजे उरलेल्या ३४ जणांनी राजीनामे दिल्याने नाशिक महपाालिकेचे राजकारण ढवळून निघाले आहे. सध्याची स्थिती बघितली तर भाजपचे ६५ नगरसेवक असून, जर शिवसेनेचे ३४ नगरसेवक आहेत. त्यांनी राजीनामा दिल्याची केवळ घोषणा केली आहे. प्रत्यक्षात त्यांनी प्रत्यक्ष येऊन महापालिकेत राजीनामे दिलेच तर शिवसेनेचे संख्याबळ शून्य होईल अन्यथा राजीनामा केवळ दबावतंत्र आणि सोयीचे राजकारण ठरेल. २०१७ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत ६१ प्रभागातील १२२ जागांपैकी भाजपाला ६६ जागांवर विजय मिळाला, तर शिवसेनेला ३५ जागांवर संधी मिळाली. भाजपचे महापालिकेत पूर्णत: बहुमत आहे. महापालिकेच्या निवडणुका शिवसेना आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली होती. लोकसभा निवडणुकीनंतर युती करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला असला तरी प्रत्यक्षात दोन उपसभापतिपदे देण्यापलीकडे त्यांना भाजपने स्थान दिले नाही. विधानसभा निवडणुकीत राजीनामा सत्र सध्या सुरू आहे. यात सर्व प्रथम शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा दिला. दातीर नाशिक पश्चिम मतदारसंघातून इच्छुक होते, परंतु ही जागा भाजपकडून सुटणार नाही असे दिसताच त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी मनसेत प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या नाशिकरोड येथील नगरसेविका सरोज आहिरे यांनीदेखील देवळाली मतदारसंघात युतीकडून उमेदवारी न मिळताच राष्टÑवादीत प्रवेश केला.या राजीनाम्यांना अर्थ नाहीशिवसेनेच्या ३४ नगरसेवकांनी राजीनामा देण्याची घोषणा केली असली तरी त्यांनी हे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार प्रत्यक्ष आयुक्तांना भेटून राजीनामे दिले तरच ते अधिकृत मानले जातात. यापूर्वी दिलीप दातीर यांनी आयुक्तांना वॉट््स अॅपवर राजीनामा दिला होता, मात्र त्यांना कायदेशीर तरतूद स्पष्ट करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष येऊन आयुक्तांकडे राजीनामा सादर केला होता. त्यानंतर भाजपच्या सरोज आहिरे यांनी शहराध्यक्षांकडे राजीनामा दिला, परंतु त्यानंतर त्यांनीही प्रत्यक्ष आयुक्तांकडे येऊन राजीनामा दिला आहे.
दोघा नगरसेवकांचेच अधिकृत राजीनामे; बाकी मात्र सोयीचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:58 IST
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या नगरसेवकांचे राजीनाम्याचे पेव फुटले असून आधी भाजपा आणि शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. पाठोपाठ मंगळवारी (दि.१५) शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी म्हणजे उरलेल्या ३४ जणांनी राजीनामे दिल्याने नाशिक महपाालिकेचे राजकारण ढवळून निघाले आहे.
दोघा नगरसेवकांचेच अधिकृत राजीनामे; बाकी मात्र सोयीचे राजकारण
ठळक मुद्देमहापालिकेतील बळ : भाजपा ६५, तर शिवसेनेचे शून्य !