सातपूर : नागरी प्रश्नावर प्रशासनावर नाकर्तेपणाचा आरोप करीत कामे करण्याची मानसिकता नसेल तर बदली करून घेण्याचा इशारा गुरुवारी (दि.१२) झालेल्या प्रभाग सभेत शिवसेना गटनेते विलास शिंदे आणि मनसे गटनेते सलीम शेख यांनी दिला.़प्रभाग सभापती योगेश शेवरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. या सभेत शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी प्रशासनाला धारेवर धरत रस्त्यात पडलेले खड्डे बुजविण्यासह डागडुजीसाठी साडेचार कोटी रु पयांचा मेंटनन्स निधी खर्चूनही परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने विविध कर रूपाने गोळा होणारा नागरिकांचा पैसा मनपाने खड्ड्यात घातला असल्याचा आरोप केला, तर मनसे गटनेते सलीम शेख यांनी हिशोब मागत आरोग्य विभागाला फैलावर घेतले. विभागातील ११ उद्यानांचे काम खासगी ठेकेदारामार्फत सुरू असून, उद्यानाची पुरती वाट लागली आहे. ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्यांना काळ्यायादीत टाकण्याची मागणी केली. कामे न करणाºया कामचुकार अधिकाºयांनी स्वत:हून बदली करून घ्यावी, असाही दिला. यावेळी नगरसेवक संतोष गायकवाड, दीक्षा लोंढे, पल्लवी पाटील, माधुरी बोलकर, रवींद्र धिवरे, हेमलता कांडेकर, नयना गांगुर्डे यांनी विविध समस्यांचा पाढा वाचून प्रशासनाला धारेवर धरले. दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांना श्रद्धांजली अर्पण करून दहा मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी बदल्या करून घ्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:09 IST
नागरी प्रश्नावर प्रशासनावर नाकर्तेपणाचा आरोप करीत कामे करण्याची मानसिकता नसेल तर बदली करून घेण्याचा इशारा गुरुवारी (दि.१२) झालेल्या प्रभाग सभेत शिवसेना गटनेते विलास शिंदे आणि मनसे गटनेते सलीम शेख यांनी दिला.
अधिकाऱ्यांनी बदल्या करून घ्याव्यात
ठळक मुद्देसातपूर प्रभाग : नागरी कामे होत नसल्याने नगरसेवक संतप्त