शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार्‍यांची अनुपस्थिती : विद्युत वितरण कामकाज ढासळले वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने खंडित वीजपुरवठा

By admin | Updated: May 18, 2014 23:49 IST

वणी : कार्यान्वित अधिकार्‍यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे वणी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कामकाजाचे बारा वाजले असून, वारंवार होणार्‍या तांत्रिक बिघाडामुळे वणीकरांना खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत असून शेती, उद्योगधंदे व पाणीपुरवठा योजनांवर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.

वणी : कार्यान्वित अधिकार्‍यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे वणी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कामकाजाचे बारा वाजले असून, वारंवार होणार्‍या तांत्रिक बिघाडामुळे वणीकरांना खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत असून शेती, उद्योगधंदे व पाणीपुरवठा योजनांवर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.एकलहरे विद्युत केंद्रातून ओझर, दिंडोरी, वणी, सुरगाणा या तालुक्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. दिंडोरी येथे १३२ के.व्ही. क्षमतेचे विद्युत केंद्र असून वणी येथे ३३ के.व्ही., पिंप्री येथे ३३ के.व्ही., करंजखेड येथे ३३ के.व्ही., सुरगाणा ३३ के.व्ही. अशा उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो.मावडी, पांडाणे, नांदुरी, ओझरखेड, सगुणा महाजीवन प्राधिकरण तिसगाव, सुरगाणा, वणी या फिडरद्वारे ठिकठिकाणी वीजपुरवठा करण्यात येतो.दिंडोरी तालुक्यातील वणी या गावात वितरण कंपनीच्या नियमानुसार समाधानकारक व अपेक्षित वसुली असल्याने या ठिकाणी भारनियमन नाही, असे वितरण कंपनीकडून सांगण्यात येते. मात्र वणी शहरी भागात या ना त्या कारणाने वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत आहे. वणी शहरासाठी कार्यरत कनिष्ठ अभियंता गेल्या चार महिन्यांपासून वणीकरांनी बघितले नाही. तात्पुरता पदभार असणारे दुसरे अधिकारी आमावस्येला गेले की पौर्णिमेला उगवतात. ग्रामपालिकेत कार्यान्वित अधिकार्‍यांच्या अकार्यक्षमतेमुळे ग्रामसभेवर बदलीचा ठराव करून त्याची प्रत वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठविली आहे; मात्र एक आमदाराचे संरक्षण या अधिकार्‍यांना असल्याने वणीकरांच्या नशिबी विद्युत समस्येचे भोग कायम आहेत. जी गत अधिकार्‍यांची तीच कर्मचार्‍यांची. बहुतांशी वायरमनचे वास्तव्य नाशिकला असल्याने किरकोळ तांत्रिक बिघाडपासून ते मोठ्या बिघाडाची जबाबदारी वणी येथे वास्तव्यास असणार्‍या वायरमनवर आहे.या सर्व बाबींचा लेखाजोखा वारंवार ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांपुढे मांडूनही यातून समस्येचे निराकारण होत नसल्याने मुख्य अभियंत्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.