शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणाऱ्या कंपनीचे नाशिकमध्येही कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:36 IST

कोपरगावच्या प्रेमराज काले टॉवरमधील पहिल्या मजल्यावर सन २०१६ मध्ये व्हिनस कॅपीटल सर्व्हिसेस कंपनी उघडून गुंतवणूकीवर कमी वेळेत दामदुप्पट करण्याचे अमिष दाखवून कंपनीचे संचालक प्रविण शंकरराव वरगुडे, राजेंद्र सुकदेव जेजुरकर, दिगंबर जानकीदास बैरागी यांनी लोकांना आकर्षित केले.

ठळक मुद्देदामदुपटीचे अमिष : कोपरगाव, लासलगावी गुन्हा दाखलतक्रार करणा-या तरूणीलाच भ्रमणध्वनीवरून धमकविण्याचा प्रकार

नाशिक : गुंतवणुकीवर कमी वेळेत दामदुप्पट देण्याचे अमिष दाखवून कोपरगाव येथील २१ गुंतवणूकदारांना सुमारे दोन कोटी रूपयांना गंडा घालणा-या व्हिनस कॅपीटल सर्व्हिसेस या कंपनीच्या तिघा भामट्यांनी निफाड तालुक्यातील विंचूर येथील शेतक-याचीही सुमारे ५६ लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच आता याच कंपनीचे नाव बदलून नाशकातील द्वारका चौकात ‘सक्सेस ट्री’ या नावाने नवीन शाखा उघडून गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले जात असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुंतवणूकदारांना गंडा घालणा-या या टोळीच्या विरोधात तक्रार करणा-या तरूणीलाच भ्रमणध्वनीवरून धमकविण्याचा प्रकारही घडला आहे.कोपरगावच्या प्रेमराज काले टॉवरमधील पहिल्या मजल्यावर सन २०१६ मध्ये व्हिनस कॅपीटल सर्व्हिसेस कंपनी उघडून गुंतवणूकीवर कमी वेळेत दामदुप्पट करण्याचे अमिष दाखवून कंपनीचे संचालक प्रविण शंकरराव वरगुडे, राजेंद्र सुकदेव जेजुरकर, दिगंबर जानकीदास बैरागी यांनी लोकांना आकर्षित केले. गुंतवणुकीतून कोपरगाव शहरात मोक्याच्या जागा घेतल्याचे दाखवून अधिकाधिक लोकांना त्यापासून फायदा मिळवून देण्याचे अमिष दाखविले व्हिनस कॅपीटल प्रमाणेच त्यांनी सुखसाई तालुका नागरी सहकारी पतसंस्था या नावानेही दुसरी कंपनी सुरू करून सहा महिन्यात पैसे गोळा केले. गावातील सुमारे २७ लोकांनी २ ते २५ लाखापर्यंतची गुंतवणूक केली व त्याच्या मोबदल्यात कंपनीने धनादेश दिले परंतु धनादेश न वटल्याने गुंतवणुकदारांनी तगादा लावताच त्यांनी कंपनी बंद करून पोबारा केला. या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात दोन कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असाच प्रकार विंचूर येथील रविंद्र मल्हारी दरेकर (४२) यांच्याबाबत घडला आहे. त्यांनी देखील ५४ लाख रूपयांची गुंतवणूक केली परंतु मुदतीत कंपनी त्यांचा पैसा परत न करू शकल्याने दि. १२ फेब्रुवारी रोजी प्रविण वरगुडे, राजेंद्र जेजुरकर, दिगंबर बैरागी यांच्याविरूद्ध लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांना गंडविल्यानंतर आता व्हिनस कॅपीटल कंपनीने नाव बदलून नाशिक शहरातील द्वारका येथे बोडके प्लाझा या इमारतीत ‘सक्सेस ट्री’ या नावाने कंपनी सुरू केल्याची तक्रार सौ. अस्मिता प्रमोद देशमाने यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या कंपनीकडून नागरिकांची फसवणूक केली जात असून, त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही सौ. देशमाने यांनी केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक