शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘रामायण’समोर फटाके फोडणाऱ्यांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:59 IST

महापौरांच्या रामायण बंगल्यासमोर फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणाºया अज्ञात व्यक्तींविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात नव्हे, तर महापौर रंजना भानसी यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी ‘आम्ही नाशिककर’ या संस्थेतर्फे पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़

ठळक मुद्देसरकारवाडा पोलीस ठाणे : अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा, ‘आम्ही नाशिककर’चे निवेदन

नाशिक : महापौरांच्या रामायण बंगल्यासमोर फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणाºया अज्ञात व्यक्तींविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात नव्हे, तर महापौर रंजना भानसी यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी ‘आम्ही नाशिककर’ या संस्थेतर्फे पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची दि. २२ नोव्हेंबरला बदली करण्यात आल्याचे आदेश सरकारने काढले़ यानंतर महापौरांच्या रामायण बंगल्यासमोर फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला़ सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या कालावधितच फटाके फोडण्यास परवानगी दिलेली आहे़ मात्र, महापौर रंजना भानसी व त्यांचे समर्थक व कार्यकर्ते यांनी दुपारी १२ ते १ या कालावधित फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान व कायद्याचा भंग करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे़फटाके फोडल्याची बातमी सर्वदूर पसरल्याने सर्वसामान्यही या कायद्याचे उल्लंघन करतील़ कायदा व सुव्यवस्थेसाठी तसेच कायदा हा सर्वांना समान आहे़ त्यामुळे महापौरांसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे़ या निवेदनावर समाधान भारतीय, अनिल भडांगे, विनायक येवले, जगबिर सिंग, योगेश कापसे, सुमित शर्मा यांच्या सह्या आहेत़कुणीच कसे आढळले नाहीत?दरम्यान, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रवींद्र सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते पीटर मोबाइलने गस्त घालीत असताना महापौरांच्या रामायण बंगल्यासमोर फटाके फोडण्याचा आवाज आला़ त्यानुसार संबंधित ठिकाणी पोहोचून संशयितांचा शोध घेतला असता फटाके फोडणारे कोणीही आढळून आले नाहीत़ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंडविधान कलम १८८, २८६ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ (१) (यू) १३१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी