नाशिक : परतीच्या ऑक्टोबर महिन्याच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून, तीन आठवड्यातच जवळपास १२६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीतही वाढ झाली असली तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाऊस कमीच आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पावसाला परतीचा वा अवकाळी पाऊस म्हणूनही संबोधले जाते. नाशिक जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात ९२३ मिलीमीटर पावसाची यापूर्वीची नोंद करण्यात आली असून, यंदा मात्र १ ते २२ ऑक्टोबर दरम्यान ११७२ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी १२६ इतकी आहे. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान वार्षिक पर्जन्यमान १५९२८ मिलीमीटर इतके असून, आजवर १७,४५७ मिलीमीटर इतका म्हणजेच वार्षिक पर्जन्यमानाच्या १०९ टक्के इतकी पावसाची नाेंद झाली आहे. सध्या सुरू असलेला पाऊस परतीचा वा अवकाळी म्हणून ओळखला जात असला तरी, दरवर्षी या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होते. शेतकऱ्यांनी जून, जुलैमध्ये पेरणी केलेले पीक ऑक्टोबर महिन्यात काढणीला आलेले असताना पावसामुळे शेतातील पीक झोपते तर ज्यांनी अगोदर काढून ठेवलेले खळ्यावरचे पीक पावसाच्या पाण्यात भिजून नुकसान होते. दरम्यान, झालेल्या पावसामुले अनेक ठिकाणी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काल पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त भागातील शेतकर्यांनी केली आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून अनेकांना बेघर होण्याची वेल आली असून त्यांचेही पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात १८ ऑक्टोबरपासून हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने तब्बल पंधरा दिवस मुक्काम ठोकला होता. त्यामुळे द्राक्ष, मका, सोयाबीन, भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाला पीक पंचनामे करण्याचे आदेश द्यावे लागले होते. यंदादेखील या अवकाळी पावसाने भात, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान केले आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये झाला १२६ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:52 IST
परतीच्या ऑक्टोबर महिन्याच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून, तीन आठवड्यातच जवळपास १२६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीतही वाढ झाली असली तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाऊस कमीच आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पावसाला परतीचा वा अवकाळी पाऊस म्हणूनही संबोधले जाते.
ऑक्टोबर महिन्यामध्ये झाला १२६ टक्के पाऊस
ठळक मुद्दे पिकांना मोठा फटका : जिल्ह्यात सरासरी १०९ टक्के नोंद