शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या मध्यभागीच अडथळा; वृक्ष ठरताहेत जीवघेणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:35 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या धोकेदायक वृक्षांजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी रिफ्लेक्टरची वाताहत झाल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे.

ठळक मुद्दे वृक्षांजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी रिफ्लेक्टरची वाताहत नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अनेक झाडे झाडांमुळे वाहतुकीला अडथळा

उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या धोकेदायक वृक्षांजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी रिफ्लेक्टरची वाताहत झाल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे.  नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अनेक झाडे रस्त्याच्या मध्ये आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे सदर झाडे तोडायला बंदी आहे. या झाडांमुळे वाहतुकीला अडथळा होत असून, अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे. धोकेदायक वृक्षांची वाहनधारकांना कल्पना यावी म्हणून झाडाच्या खाली लोखंडी पाटीचे रिफ्लेक्टर लावण्यात आले होते.  महामार्गावरील वाहनांच्या धुरामुळे जमिनीपासून झाडाच्या खोडापर्यंत वृक्ष काळवंडून गेले आहेत. यामुळे सायंकाळनंतर अंधारात वाहनधारकांना रस्त्यातील वृक्षांचा अंदाज येत नाही. त्या ठिकाणी लावलेल्या लोखंडी रिफ्लेक्टरच्या प्लेटा या वाहनांच्या धडकेमुळे काही ठिकाणी तुटून गेल्या आहेत. तर काही प्लेटा भुरट्या चोरांनी चोरून नेल्या आहेत.  यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अनेक निरपराध वाहनधारकांचे बळी गेले आहेत, तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत दुतर्फा असलेल्या धोकेदायक वृक्षांजवळ नवीन रिफ्लेक्टर बसवावे, अशी मागणी केली जात आहे. रिफ्लेक्टरची झाली वाताहत नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलदरम्यान दुतर्फा मार्गावरील रस्त्यामध्ये असलेल्या धोकेदायक वृक्षांजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी रिफ्लेक्टर प्लेट काही ठिकाणी तुटून पडल्या आहेत. काही ठिकाणी लोखंडी सांगाडा वाकलेल्या स्थितीत उभा आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना रस्त्यामधील वृक्षांचा अंदाज येत नसल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. विशेषत: रात्रीच्यावेळी वारंवार अपघात होतात.  महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत दुतर्फा असलेल्या धोकेदायक वृक्षांजवळ नवीन रिफ्लेक्टर बसवावे. याठिकाणी रिफ्लेक्टर नसल्याने अपघात होतात.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाtraffic policeवाहतूक पोलीस