शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचे क्लिनिक्स, पॅथालॉजी लॅब यांनाही महापालिकेची नोंदणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:33 IST

शहरातील गल्लीबोळात थाटण्यात आलेले डॉक्टरांचे क्लिनिक्स आणि रक्त-लघवी तपासणी करणाºया पॅथालॉजी लॅब यांनाही महापालिकेची नोंदणी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, त्यामुळे बेकायदेशीर कृत्यांना रोख लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, नाशिक प्रॅक्टिसिंग पॅथालॉजिस्ट वेल्फेअर असोसिएशनने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला स्वत:हून पत्र देत तशी नोंदणी करण्याची गळ घातली आहे.

ठळक मुद्देबेकायदेशीर कृत्यांना रोख लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न महापालिकेकडे रितसर नोंदणी करणे आवश्यक अनेक रुग्णालयांनी अद्यापही नोंदणीचे नूतनीकरण केलेले नाही

नाशिक : शहरातील गल्लीबोळात थाटण्यात आलेले डॉक्टरांचे क्लिनिक्स आणि रक्त-लघवी तपासणी करणाºया पॅथालॉजी लॅब यांनाही महापालिकेची नोंदणी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, त्यामुळे बेकायदेशीर कृत्यांना रोख लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, नाशिक प्रॅक्टिसिंग पॅथालॉजिस्ट वेल्फेअर असोसिएशनने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला स्वत:हून पत्र देत तशी नोंदणी करण्याची गळ घातली आहे.  शहरातील खासगी रुग्णालये, सोनोग्राफी सेंटर्स यावर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे नियंत्रण आहे. संबंधित रुग्णालये, सेंटर्स यांना महापालिकेकडे रितसर नोंदणी करणे आवश्यक असते. अनेक रुग्णालयांनी अद्यापही नोंदणीचे नूतनीकरण केलेले नसल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगितले जाते. दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रात वाढत चाललेल्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी शहरातील क्लिनिक्स, पॅथालॉजी लॅब यांनाही महापालिकेच्या कक्षेत आणण्याचा विचार वैद्यकीय विभागाकडून केला जात असून, त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच आयुक्तांकडे ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. शहरातील रक्त-लघवी तपासणी करणाºया पॅथालॉजी लॅबची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात बºयाच लॅब या अनधिकृत असल्याची चर्चा असून, त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने रुग्णांकडून मोठ्या प्रमाणावर लूटही सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. पॅथालॉजी लॅबसंदर्भात वाढत्या तक्रारींमुळे आता नाशिक प्रॅक्टिसिंग पॅथालॉजिस्ट वेल्फेअर असोसिएशनने स्वत:हून पुढाकार घेत शहरातील पॅथालॉजी लॅब यांना नोंदणी करणे अनिवार्य करण्याची मागणी केलेली आहे. शहरात बेकायदेशीरपणे प्रॅक्टिस सुरू असल्याचा दावाही असोसिएशनने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरात गल्लीबोळात थाटलेले क्लिनिक्स आणि पॅथालॉजी लॅब यांनाही नोंदणी करणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आयुक्तांच्या मान्यतेनंतर तसा प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली. सन २०१५पर्यंत क्लिनिक्सची नोंदणी महापालिकेकडे यापूर्वी सन २०१५ पर्यंत क्लिनिक्सची नोंदणी केली जात होती. परंतु, ज्याठिकाणी रुग्ण उपचारासाठी दाखल होत नाहीत, केवळ तपासणी केली जाते. अशा क्लिनिक्सची नोंदणी बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टनुसार करणे अनिवार्य नसल्याचे पत्र शासनाच्या आरोग्य विभागाने महापालिकेला पाठविले होते. त्यानंतर, क्लिनिक्सची नोंदणी बंद आहे. मात्र, वाढते गैरप्रकार लक्षात घेता महापालिकेने पुन्हा या क्लिनिक्सला आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाdoctorडॉक्टर