शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात कार्यालयांमध्ये व्यसनमुक्तीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:24 IST

येवला : शहर व तालुका परिसरातील विविध शाळा, संस्था, शासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते. या निमित्ताने शासकीय कार्यालयांमधून व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली.

ठळक मुद्दे प्रांताधिकारी सोपान कासार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शहर व तालुका परिसरातील विविध शाळा, संस्था, शासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते. या निमित्ताने शासकीय कार्यालयांमधून व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली.शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्र म तहसील कार्यालयात झाला. प्रांताधिकारी सोपान कासार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तहसीलदार रोहिदास वारूळे उपस्थित होते.पंचायत समिती कार्यालयात सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्र मास गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख व कर्मचारी उपस्थित होते.येवला शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील टिळक मैदान येथे सेवानिवृत्त सैनिक नवनाथ दाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नाशिक जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. माणिकराव शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, नानासाहेब शिंदे, अण्णासाहेब पवार, चांगदेव खैरे, रांजेद्र घोडके, दत्तात्रय चव्हाण, नंदकुमार शिंदे, मुकुंद पोफळे, राजे आबासाहेब शिंदे, भगवान रसाळ, महेश भांडगे आदी उपस्थित होते.येवला नगरपालिका कार्यालयात नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपनगराध्यक्ष सूरज पटणी, मुख्याधिकारी संगीता नांदूकर, उपमुख्याधिकारी पाटील उपस्थित होते. येवला तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या हस्ते, तर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्यसैनिक पाल्य प्रकाश माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्याचप्रमाणे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात माजी नगराध्यक्षा राजश्री पहिलवान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी राधाकिसन सोनवणे, बाळासाहेब लोखंडे, भगवान लोंढे, साहेबराव मढवई, दीपक लोणारी, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, प्रवीण पहिलवान, गणेश पंडित, समीना शेख, गोटू मांजरे, सचिन कळमकर, नितीन आहेर आदी उपस्थित होते. येवला मर्चंट्स को. आॅप बँकेत चेअरमन अरुण काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.संतोष माध्यमिक विद्यालय, रहाडीजगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित रहाडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य अरुण पैठणकर यांच्या हस्ते ध्वजपूजन, तर पोलीसपाटील नितीन गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सूत्रसंचालन वसंत वाघ यांनी केले.सरस्वती विद्यालय, सायगावसायगाव येथील सरस्वती विद्यालयात माजी विद्यार्थी व स्वातंत्र्यसैनिक नवनाथ देवराम उशीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष बबन उशीर तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत कुळधर, शिक्षक -पालक संघाचे उपाध्यक्ष वसंत खैरनार उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक सी. बी. कुळधर यांनी केले. सुरेश देवरे, बी. डी. पैठणकर, अशोक शेलार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस