शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

ओशिया मातेची महाआरती, जागरण सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:05 IST

अखिल भारतातील ५२ शक्तिपीठापैकी एक असलेली राजस्थानमधील अनेक कुळाची कुलस्वामिनी मूळमाता श्री सच्चियाय (ओशिया) मातेच्या महाआरतीने सोमवारी (दि. १९) रात्री उशिरा जागरण सोहळ्यास सुरुवात झाली. श्री सच्चियाय (ओशिया) माता सेविक संघ नाशिकतर्फे यावर्षीही प्रथमच चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला सज्योत महाआरती व भव्य जम्मा जागरण करीत ओशिया मातेचा जयघोष केला.

नाशिक : अखिल भारतातील ५२ शक्तिपीठापैकी एक असलेली राजस्थानमधील अनेक कुळाची कुलस्वामिनी मूळमाता श्री सच्चियाय (ओशिया) मातेच्या महाआरतीने सोमवारी (दि. १९) रात्री उशिरा जागरण सोहळ्यास सुरुवात झाली. श्री सच्चियाय (ओशिया) माता सेविक संघ नाशिकतर्फे यावर्षीही प्रथमच चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला सज्योत महाआरती व भव्य जम्मा जागरण करीत ओशिया मातेचा जयघोष केला. राजस्थानी समाज उद्योग धंद्यामुळे जगभर पसरला असून, अनेकजण आपल्या कुलाचारासाठी राजस्थानमध्ये जाऊन ओशिया मातेच्या चरणी नतमस्तक होतात. परंतु काही भक्तांना मूळस्थानी शक्य होत नसल्याने त्यांनी मखमलाबादरोड परिसिरातील श्रद्धा लॉन्स येथे आपल्या कुलस्वीमिनीच्या कुलाचारासाठी ओशिया मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाआरती व जागरण केले. ओशिया मातेची सज्योत पारिवारिक महाआरती ही आगळीवेगळी संकल्पना असून, आरतीसाठी सामान्यातला सामान्य परिवारालाही आरतीचा मान मिळत असल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात या जागरण सोहळ्यास उपस्थिती नोंदवली. याप्रसंगी कोलकाता येथील भजन सम्राट राहुल ग्रेवाल व सहकारी यांनी भजन व नृत्य नाटिका सादर करीत ओशिया मातेच्या जागरणात संगीत सेवा सादर केली. यावेळी उत्सव समितीचे सतीश बोरा, बद्रीनारायण सारडा, महेश कलंत्री, किरण बद्दर, दीपक चोपडा, विजय बाफना, मुकुंद राठी, राजेंद्र कुमट, धीरज मालू, राजेश धूत आदी उपस्थित होते.विविध भजने सादरयावेळी ‘मैया तु नवरात्री मै धरतीपर आती हो’, ‘मैय्या का चोला लाल लाल हो गया’ आदी भजने सादर करण्यात आली. आपल्या रहिवासाच्या ठिकाणीच एकत्र येऊन ओशिया मातेची महाआरती व जागरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. नाशिकमधील ओसिया मातेच्या भक्त-परिवाराने या जाहरण सोहळ्यात उत्साहात सहभागी होत महाआरती केली.

टॅग्स :Nashikनाशिक