शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजामुळे ओढावते ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:14 IST

नायलॉन मांजाचा वापर करून पतंगबाजीची हौस भागविण्यास सुरुवात झाल्याचे आकाशात दिसणाऱ्या पतंगवरून लक्षात येते. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांसह मानवावरही दरवर्षी ‘संक्रांत’ ओढावते. नायलॉन मांजाने मानेला, चेहºयाला गंभीर दुखापत होऊन जायबंदी होण्याच्या घटना शहर व परिसरात घडतात. यामुळे नायलॉन मांजाच्या वापर-विक्रीवर कायदेशीर बंदी जाहीर करण्यात आली आहे.

लोकमत विशेषनाशिक : नायलॉन मांजाचा वापर करून पतंगबाजीची हौस भागविण्यास सुरुवात झाल्याचे आकाशात दिसणाऱ्या पतंगवरून लक्षात येते. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांसह मानवावरही दरवर्षी ‘संक्रांत’ ओढावते. नायलॉन मांजाने मानेला, चेहºयाला गंभीर दुखापत होऊन जायबंदी होण्याच्या घटना शहर व परिसरात घडतात. यामुळे नायलॉन मांजाच्या वापर-विक्रीवर कायदेशीर बंदी जाहीर करण्यात आली आहे. तरीदेखील पतंगबाजीसाठी सर्रासपणे नायलॉन मांजा वापरला जात असल्याने ही बंदी कागदोपत्रीच असल्याचे बोलले जात आहे.पर्यावरण व नैसर्गिक जैवविविधतेच्या संवर्धन व संरक्षणासाठी वनविभागासह महापालिका, पोलीस, जिल्हा प्रशासनाने संयुक्तरीत्या ठोस पावले उचलून नायलॉन मांजा वापर व विक्रीविरोधात धडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. आगामी मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीचे वेध बाजारपेठेसह तरुणाईला लागले आहेत. आकाशात पतंग भिरभिरताना दिसत आहेत. शहरातील बाजारपेठांमध्ये नायलॉन मांजाचे रीळ चोरी-छुप्या मार्गाने अगदी सहज उपलब्ध होत आहेत. आपला पतंग समोरच्या स्पर्धक पतंगपुढे टिकून रहावा यासाठी नायलॉन मांजाच्या वापराला तरुणाई पसंती देते.  मात्र अवघ्या दोन ते दहा रुपयांच्या पतंगमुळे मुक्या जिवांचा जीव धोक्यात येतो तर मानवालाही दुखापतीचा सामना  करावा लागतो. याबाबत सातत्याने जनप्रबोधनही केले जाते;  मात्र नायलॉन मांजाचा वापर थांबता थांबत नसल्याचे चित्र  आहे.नायलॉन मांजाचा सापळा वर्षानुवर्षे ‘जैसे थे’वाºयाचा दाब आणि घर्षणामुळे नायलॉन मांजादेखील तुटतो आणि वेगाने जमिनीच्या दिशेने झेपावतो. यामुळे अनेक दुचाकीस्वार, पादचाºयांच्या मानेला दुखापत होण्याच्या घटना सातत्याने डिसेंबर ते जानेवारीअखेरपर्यंत घडतात. तसेच बहुतांश पक्ष्यांंवरही या मांजाच्यारूपाने ‘संक्रांत’ ओढावते. झाडांवर नायलॉन मांजाचे जाळे वर्षानुवर्षे तसेच राहते. हा मांजा वातावरणात दीर्घकाळ ‘जैसे थे’ राहत असल्याने पक्ष्यांच्या पंखांना तसेच पायांना मांजाचा पीळ बसून पक्षी मृत्युमुखी पडण्याच्या घटना सातत्याने घडतात.गिधाडही पडले मृत्युमुखीगेल्या वर्षी मकरसंक्रांतीला सातपूर भागात संध्याकाळी नायलॉन मांजाने पंख कापले गेल्याने एक गिधाड घरावर आदळून मृत्युमुखी पडले. पक्ष्यांमध्ये सर्वांत मोठा व शक्तिशाली म्हणून गिधाड पक्षी ओळखला जातो. या मृत्युमुखी पडलेल्या गिधाडाचे वजन साधारणत: साडेचार किलो होते तर वय दोन ते अडीच वर्षे इतके होते. नायलॉन मांजामुळे गिधाडसारखा शक्तिशाली पक्षी मृत्युमुखी पडत असेल तर अन्य लहान पक्ष्यांची काय अवस्था होत असेल त्याची कल्पना न केलेली बरी.

 

 

 

 

 

 

टॅग्स :Nashikनाशिक