शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाचा साठा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:55 IST

शहरासह जिल्ह्यात नायलॉन मांजावर बंदी घोषित करण्यात आली आहे. तरीदेखील चोरीछुप्या पद्धतीने याची शहरात विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शहरात मागील काही दिवसांपासून पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.

ठळक मुद्देगुन्हे शाखा युनिट-१ : दोन लाखांचे तीनशे गट्टू जप्त

पंचवटी : शहरासह जिल्ह्यात नायलॉन मांजावर बंदी घोषित करण्यात आली आहे. तरीदेखील चोरीछुप्या पद्धतीने याची शहरात विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शहरात मागील काही दिवसांपासून पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाला यामध्ये मोठे यश आले असून, शहरातील महत्त्वाचा पुरवठादार मानला जाणारा दिलीप पतंगवाला याने नायलॉन मांजाचा मोठा साठा करून ठेवला होता. हा साठा पथकाने धाड टाकून जप्त केला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर होणारी नायलॉन मांजाची विक्री व वापराबाबत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्वच पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेला कुणकुण लागली होती. नायलॉन मांजाचा मोठा बॉक्स घेऊन एक विक्रेता रविवार कारंजा भागातून जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या वेशातील पोलिसांनी सापळा शनिवारी (दि. १२) रचला.संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अ‍ॅक्सेस मोपेड दुचाकीवरून (एमएच १५ ईझेड ६३८१) संशयित दिलीप पांडुरंग सोनवणे हा नायलॉन मांजाचा बॉक्स घेऊन जात असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत कसोशीने त्याची चौकशी केली व झडती घेत त्याच्याजवळील बॉक्स जप्त केला. तसेच नायलॉन मांजाचा गुप्त साठा कोठे असल्याची माहिती घेत वाघ यांच्यासमवेत वसंत पांडव, आसिफ तांबोळी, स्वप्नील जुंदे्र आदींनी त्याठिकाणी धाड टाकली. दिल्ली येथून मागविण्यात आलेल्या नायलॉन मांजाचे ३०० गट्टू पोलिसांनी गुदामातून हस्तगत केले आहे.या साठ्याची एकूण किंमत अंदाजे दोन लाख २२ हजार रुपये इतकी आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व नायलॉन मांजाचा साठा असा एकूण पावणेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सोनवणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शहरात ठिकठिकाणी होणार होता पुरवठापोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यांनी नायलॉन मांजावर ‘डोळा’ ठेवला असला तरी चोरीछुप्या पद्धतीने विक्रेत्यांकडून नायलॉन मांजाची मागणी मोठ्या पुरवठादारांकडे होत आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे नायलॉन मांजाला मोठा ‘भाव’ काळ्या बाजारात आला आहे. यामुळे या साठ्याच्या आधारे शहरात विविध ठिकाणी पुरवठा केला जाणार होता; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा ‘डाव’ उधळला गेला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी