शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाने कापला युवकाचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 01:05 IST

दुचाकीने जात असताना नायलॉन मांजा अडकल्याने गळा कापला गेल्याची घटना सिन्नर शहरात बसस्थानका- जवळ घडली. नायलॉन मांजाने स्नायू व रक्तवाहिनी तुटल्याने युवकावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रिया केल्यानंतर युवकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती डॉ. संदीप मोरे यांनी दिली.

ठळक मुद्देसिन्नर : रक्तवाहिनी तुटल्याने तातडीने शस्त्रक्रिया; प्रकृ तीत सुधारणा

सिन्नर : दुचाकीने जात असताना नायलॉन मांजा अडकल्याने गळा कापला गेल्याची घटना सिन्नर शहरात बसस्थानका- जवळ घडली. नायलॉन मांजाने स्नायू व रक्तवाहिनी तुटल्याने युवकावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रिया केल्यानंतर युवकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती डॉ. संदीप मोरे यांनी दिली.माळेगाव औद्योगिक वसाहतीतल्या हिंदुस्तान युनिलिव्हर कारखान्यात नोकरीला असलेला व शहरातील एस.टी. कॉलनीत राहणारा उमाकांत मधुकर नवले (३२) हा युवक वडिलांचा जेवणाचा डबा घेऊन बसस्थानकात दुचाकीवरून आला होता. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बसमध्ये डबा ठेवल्यानंतर उमाकांत मोटारसायकलने गावठा भागाकडे जात असताना नाशिक-पुणे महामार्गावर नायलॉन मांजा उमाकांतच्या गळ्यात अडकला. धारदार मांजाने उमाकांतचा क्षणार्धात गळा कापला गेला. काही समजण्याच्या आत घडलेल्या प्रकाराने न डगमगता उमाकांतने दुचाकीवर स्वत:चा तोल सांभाळला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानंतरही उमाकांतने हिंमत सोडली नाही.घडलेला प्रकार पाहून राजेंद्र जगझाप व सोमनाथ बकरे हे मदतीला धावले. त्यानंतरही उमाकांतने दुचाकी चालवत जवळच असलेले यशवंत हॉस्पिटल गाठले. तोपर्यंत मोठा रक्तस्राव झाला होता. गळ्यातील स्नायू व रक्तवाहिनी तुटल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. उमाकांत याचे थोरले बंधू प्रेस फोटोग्राफर कैलास नवले बाहेरगावी होते. मात्र नातेवाईक व मित्रांनी तातडीने निर्णय घेऊन उमाकांत याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. दुपारनंतर उमाकांत याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. गळ्याला सुमारे ५० ते ६० टाके पडल्याची माहिती डॉ. मोरे यांनी दिली. सुदैवाने श्वासनलिकेला दुखापत न झाल्याने अनर्थ टळला.नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईची गरजनायलॉन मांजा विक्रीवर बंदी आहे. त्यानंतरही शहर व परिसरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत असल्याने दिसते. नायलॉन मांजा पक्ष्यांनाच नव्हे तर माणसांनाही जीवघेणा ठरतो; मात्र नगर परिषदेकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांना केवळ समज दिली जाते. नवले यांच्यावर बेतलेला प्रसंग गांभीर्याने घेऊन नगर परिषदेच्या पथकाने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक निर्बंध आणून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातoperation all outऑपरेशन ऑल आऊट