शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी बाधितांचा आकडा वाढता वाढे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:07 IST

मालेगाव शहरात गेल्या तीन-चार दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांचा मंदावलेला वेग मंगळवारी (दि.१९) पुन्हा वाढला असून, दिवसभरात ३0 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मालेगाव शहरातील प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. विशेष म्हणजे बाधित रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे पश्चिम भागातील आहेत.

ठळक मुद्देदिवसभरात ३0 बाधित : बहुतांश रुग्ण पश्चिम भागातील

मालेगाव : शहरात गेल्या तीन-चार दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांचा मंदावलेला वेग मंगळवारी (दि.१९) पुन्हा वाढला असून, दिवसभरात ३0 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मालेगाव शहरातील प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. विशेष म्हणजे बाधित रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे पश्चिम भागातील आहेत.शहरात मंगळवारी सकाळी आलेल्या चाचणी अहवालात २४ जण कोरोनाबाधित आढळून आले, तर काही तासांनी आलेल्या दुसऱ्या अहवालात पुन्हा ६ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने बाधितांचा आकडा दिवसभरात ३0 वर जाऊन पोहोचला. मालेगाव शहरातील एकूण बाधितांची संख्या आता ६४८ झाली आहे. सोमवारी रात्रीपर्यंत एकूण बाधितसंख्या ६१९ होती. त्यात दिवसभरात ३0 रुग्णांची भर पडली आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून मिळणाºया बाधितांची संख्या घटत असताना मंगळवारी एकदम ३0 रुग्ण बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता १९० जणांचे तपासणी अहवाल आले. त्यातील १६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर त्यात बाधितांची संख्या २४ होती. यात १६ पुरुष, ८ महिला तसेच ३-४ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. दुपारनंतर आलेल्या अहवालात पुन्हा ६ रुग्ण बाधित आढळून आले. यात रमजानपुरा, द्याने, बिदरबाग येथील प्रत्येकी एक तर शहरातील दोन जणांचा समावेश आहे. गेल्या तीन-चार दिवसात बाधितांचा वेग मंदावला असतानाच मंगळवारी त्यात पुन्हा भर पडली.२६ जणांना डिस्चार्जसोमवारी (दि.१८) नवीन डिस्चार्ज पॉलिसीच्या धोरणानुसार शहरातील २६ कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले. यात मन्सुरा हॉस्पिटल व प्रशासकीय इमारत येथील एकूण १७, तर सहारा हॉस्पिटल येथून ३, एमएसजी कॉलेज येथून ४, फरान हॉस्पिटल येथून २ अशा २६ रुग्णांना नवीन धोरणानुसार डिस्चार्ज करण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच निगेटिह अहवाल येण्याचेही प्रमाण वाढले असल्याने आरोग्य यंत्रणेला तेवढाच दिलासा लाभत आहे. मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालात १९० पैकी तब्बल १६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

टॅग्स :Malegaonमालेगांवcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल