शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

पिंपळगाव परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत यंदा घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:18 IST

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची भीती आणि पोलीस प्रशासनाची उत्सवाबाबत केलेली कडक नियमावली यामुळे अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपळगाव बसवंत व परिसरातील दरवर्षी १२३ मंडळे असतात. यावर्षी फक्त ९ मंडळांनी नोंदणी केली आहे, तर १२ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ला पसंती दिली आहे.

ठळक मुद्देयात्रा, देखाव्याच्या परंपरेत खंड : १२ गावात ’एक गाव, एक गणपती’ला पसंती

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची भीती आणि पोलीस प्रशासनाची उत्सवाबाबत केलेली कडक नियमावली यामुळे अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपळगाव बसवंत व परिसरातील दरवर्षी १२३ मंडळे असतात. यावर्षी फक्त ९ मंडळांनी नोंदणी केली आहे, तर १२ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ला पसंती दिली आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सार्वजनिक उत्सव मंडळांसाठी नियमावली तयार केली आहे. या सूचनेनुसार पिंपळगाव व परिसरातील मंडळांनी उत्सवाच्या मंडपासाठी पिंपळगाव पोलीस ठाण्याकडून परवानगी मागितली आहे. मंडळांनी मंडपांचा आकार कमी करण्याबरोबरच उत्सवाचे दिवसही कमी करून साधेपणाने उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. घरगुती गणेशोत्सवास प्रतिसादग्रामीण भागातही शंभरपेक्षा जास्त मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. परंतु यावर्षी कोरणामुळे असलेले निर्बंध व वाढती रु ग्ण संख्या बघता सार्वजनिक मंडळांची संख्या खूपच मर्यादित राहिली आहे. प्रत्येक गावात कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आल्याने यावर्षी अनेक मंडळांनी गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कोरोनाच्या भीतीमुळे यंदा सार्वजनिकऐवजी घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यावर सर्वांचाच भर राहिला आहे.पिंपळगाव बसवंत येथील नॅशनल हायवे मित्रमंडळाचा सर्वात मोठा गणपती असल्याने मोठी यात्रा भरते. तसेच विविध देखावे सादर करण्याची पन्नास वर्षांची मित्रमंडळाची परंपरा आहे. परंतु यावर्षी कोरोनामुळे यात्रेची व मोठ्या देखाव्याची परंपरा खंडित झाली आहे. कोरोनाचे विघ्न टळावे, असे साकडे गनरायाला घातले आहे.- गणेश बनकर, अध्यक्ष, नॅशनल हायवे मित्रमंडळ

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवnifadनिफाड