शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे परिसरात गहू सोंगणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 17:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सर्वत्र गहू सोंगणीच्या कामाला वेग आला आहे. नाशिक पूर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सर्वत्र गहू सोंगणीच्या कामाला वेग आला आहे.नाशिक पूर्व भागातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी, एकलहरेगाव आदी गावांमध्ये गेल्या आठवडाभरापासून शेतकरी वर्ग गहू काढणीच्या कामात व्यस्त आहे. या भागातील गावांमध्ये हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने गहू सोंगणीचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. हार्वेस्टर मशीनद्वारे शेतात वाळलेला गहू मळला जातो. मशीनमधून गव्हाचे दाणे एका बाजूला, तर भुसा दुसऱ्या बाजूला पडतो. हार्वेस्टर मशीनच्या एका टाकीत सुमारे १८ ते २० क्विंटल गहू साचला की तो ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत किंवा शेतात ताडपत्रीवर टाकून पोत्यांमध्ये भरला जातो. गहू काढण्याचा मोबदला म्हणून हार्वेस्टर मशीनचालकाला एकरी १८०० ते २००० रुपये मजुरी दिली जाते. यंत्राने सोंगणी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे काम सोपे झाले आहे. त्यामुळे मजुरीचा खर्च आणि वेळेची बचत होते.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी