शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कालवा समितीच्या बैठका जिल्ह्यांतच होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 20:32 IST

नाशिक : धरणांमधून शेतीसाठी सोडण्यात येणारी आवर्तने तसेच शहरी भागातील पाणीपुवरवठ्याच्या नियोजनासंदर्भातील बैठका आता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या-त्या जिल्ह्यातच होणार ...

नाशिक : धरणांमधून शेतीसाठी सोडण्यात येणारी आवर्तने तसेच शहरी भागातील पाणीपुवरवठ्याच्या नियोजनासंदर्भातील बैठका आता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या-त्या जिल्ह्यातच होणार आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर करतील, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.१८) जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे यांनी कालवा समितीच्या बैठकांमध्ये स्थानिक आमदारांना विचारात घेऊन त्यांची भूमिका जाणून घेणे महत्त्वाचे असते. असे सांगतानाच जलसंपदामंत्र्यांकडे मुंबईत बैठक घेतली जात असल्याने ही पद्धत बदलली पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री भुजबळ यांनी या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगताना पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.जिल्ह्याच्या पाणी नियोजनासंदर्भात यापूर्वी मुंबईत जलसंपदामंत्र्यांकडे बैठका घेण्यास सुरुवात झालेली होती. तसा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. परंतु आता लवकरच या संदर्भातील फेर आदेश निघणार असून, जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालीच अशा बैठकांना पुन्हा सुरुवात होईल, अशी शक्यता भुजबळ यांनी वर्तविली.दरम्यान, पाणी नियोजनासंदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आमदारांचा सहभाग आणि भूमिका महत्त्वाची असल्याने आमदरांनाच कालवा समितीचे अध्यक्षपद मिळावे, अशी मागणीदेखील काही आमदारांनी यावेळी केली. जिल्ह्याच्या पाणी नियोजनासंदर्भात पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणीच अशा बैठका होणार घेण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण