शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लर्निंग लायसन्स मिळणार घरबसल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 17:19 IST

लर्निंग लायसन्स तसेच नवीन वाहनांची नोंदणी प्रक्रिया या सेवा देण्याची तयारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केली आहे. शिकाऊ लायसन्स तसेच वाहनांच्या नोंदणीसाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.

ठळक मुद्देफेसलेस सेवा : आरटीओत जाण्याची नाही गरजफेसलेस उपक्रमाच्या माध्यमातून आळा

नाशिक : केंद्र शासनाने आधार क्रमांकावर आधारित फेसलेस सेवा सुरू केली असून, या प्रणालीच्या माध्यमातून परिवहन विभागाने दोन सेवा कार्यान्वित केल्या आहेत. त्यानुसार आता लर्निंग लायसन्स काढणे अगदी सुलभ होणार आहे. नागरिकांना घरबसल्या लर्निंग लायसन्सची चाचणी देता येणार आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.आरटीओ कार्यालयातील दलालांचा हस्तक्षेप करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी अजूनही दलालांच्या माध्यमातूनच अनेक कामे करावी लागत आहेत. संकेतस्थळावरून ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतल्यानंतरही आरटीओ कार्यालयात शिकाऊ लायसन्स काढण्यासाठी संपूर्ण दिवस लागतोच. संकेतस्थळावरील माहिती भरतानाही अनेकदा अडचणी येतात. अनेकांना माहिती भरणे जमत नसल्याने त्यांना अशा मध्यस्थांची मदत घ्यावीच लागते. त्यामुळे अजूनही आरटीओ कार्यालयाच्या आवारात लॅपटॉप घेऊन बसलेले अनेक दलाल दिसून येतात.        केंद्र शासनाच्या फेसलेस उपक्रमाच्या माध्यमातून या प्रकाराला आता आळा बसणार आहे. लर्निंग लायसन्स तसेच नवीन वाहनांची नोंदणी प्रक्रिया या सेवा देण्याची तयारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केली आहे. त्यामुळे शिकाऊ लायसन्स तसेच वाहनांच्या नोंदणीसाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.

 

टॅग्स :NashikनाशिकRto officeआरटीओ ऑफीस