शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

रणजी सामना : जडेजाचे शतके अवघ्या तीन धावांनी हुकले सौराष्ट्र ३ बाद २५९ धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 7:16 PM

नाशिक : स्रेल पटेल (८४) आणि विश्वराज जडेजा (९७) यांच्यात झालेल्या २४६ धावांच्या भागिदारीच्या जोरावर सौराष्ट्र ने पहिल्या दिवशी ३ ...

ठळक मुद्देजडेजाचे शतक मात्र अवघ्या तीन धावांनी हुकले

नाशिक: स्रेल पटेल (८४) आणि विश्वराज जडेजा (९७) यांच्यात झालेल्या २४६ धावांच्या भागिदारीच्या जोरावर सौराष्ट्र ने पहिल्या दिवशी ३ बाद २५९ धावा उभारल्या. पदार्पणातच शतकाच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या जडेजाचे शतक मात्र अवघ्या तीन धावांनी हुकले तर शतकाकडे वाटचाल करणाऱ्या पटेलच्या पदरीही निराशा आली.हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र  विरूद्ध सौराष्ट्र रणजी क्रिकेट सामन्याचा पहिला दिवस सौराष्ट्र च्या फलंदाजांनी गाजविला. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या महाराष्ट्र ला हा निर्णय फारसा लाभदायक ठरला नाही. सकाळच्या सत्रात खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल असेल असे वाटत असतांना सौराष्ट्र च्या फलंदाजांनी दमदार सुरूवात केली. सकाळच्या सत्रात संथ खेळपट्टीवर गोलंदाजांना फारशी मदत मिळत नसल्याने सौराष्ट्र ने आरामात धावा जमविल्या. सलामीवीर हार्विक देसाई आणि स्नेल पटेल यांनी संयमी खेळ करून धावफलक हालता ठेवला. देसाईने अर्धशतक झळकविल्यानंतर खेळाची सुत्रे हाती घेताच वैयक्तिक ५५ धावसंख्येवर अनुमप संकलेचाने त्याला पायचित केले. त्यावेळी संघाची धावसंख्या ९८ इतकी होती. देसाईने ९९ चेंडूत ५५ धावांची खेळी केली.स्नेल पटेलच्या जोडीला आलेल्या विश्वराज जडेजाने काहीसा संतुलित खेळ करीत स्नेलला चांगली साथ दिली. उपहारानंतर स्नेलने १०३ चेंडून अर्धशतक साजरे केले तेंव्हा संघाची धावसंख्या १५० इतकी होती. तर विश्वराज जडेजाने अवघ्या ६३ चेंडूत जलद अर्धशतक ठोकले. चहापानापर्यंत सौराष्ट्र  धावसंख्या एक बाद २२० इतकी होती. गोलंदाजांना पहिल्या दिवशी खेळपट्टीची मदत मिळाली नसली तरी फलंदांजांनी मात्र या खेळपट्टीवर चांगल्या धाव जमविल्या. उपहारानंतर धावसंख्येला आकार देत दोघांनीही चेंडू सिमापार धाडले. पदार्पणातच मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणारा जडेजा शतकाजवळ पोहचला असतांनाच ९७ धावसंख्येवर अक्षय पालकरने त्याला झेलबाद केले. पुढच्याच चेंडून पटेलही ८४ धावसंख्येवर संकेलेचाचा बळी ठरला. धावांचा डोंगर उभारण्याच्या दिशेने वाटचाल करणारे दोघेही तंबूत परतल्यानंतर धावगती काहीशी मंदावली. महाराष्ट्र च्या गोलंदाजांनी अचुक मारा करून धावगतीला आळा घातला. खेळ संपला तेंव्हा शेल्डर जॅक्सन १२ तर अर्पित वसवधा ११ धावांवर खेळत होते.

टॅग्स :NashikनाशिकRanji Trophyरणजी करंडक