शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एप्रिलपासून शेतकरी अपघात विमा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 20:10 IST

नाशिक : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यास नैसर्गिक आपत्तीमुळे इजा झाल्यास अथवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना मदत व्हावी यासाठी ...

नाशिक : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यास नैसर्गिक आपत्तीमुळे इजा झाल्यास अथवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना मदत व्हावी यासाठी कृषी विभागाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे. गेल्या ७ एप्रिलपासून योजनेला सुरुवात झाली असून, एप्रिल २०२२ पर्यंत योजनेचा कालावधी असणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. एस. सोनवणे यांनी दिली आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपनीकडे विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. या योजनेंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील. तथापि सदर योजनेंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत पात्र ठरणार नाही, असे पत्रकात म्हटले आहे.शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये व अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. विमा दावा अर्जासोबत विहित नमुन्यातील पूर्वसूचना अर्ज, पूर्वसूचनेसोबत आवश्यक कागदपत्रे सातबारा उतारा, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल, विजेचा धक्का अपघात, वीज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरून पडून झालेला मृत्यू, सर्पदंश, विचूदंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा, वयाचा दाखला , ६-क, ६-ड आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. विमा दावा दुघर्टनेनंतर ४५ दिवसांच्या आत प्रस्ताव तयार करून तालुका कृषी अधिकारी यांना सादर करावा लागणार आहे. याबाबत मार्गदर्शनासाठी व गावातील कृषी साहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. एस. सोनवणे यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी