शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 19:26 IST

नाशिक : डिसेंबरमध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ...

नाशिक: डिसेंबरमध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार येत्या  २३ तारखेपासून नामनिर्देशन पत्र दाखल तर १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, जिल्ह्यात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. यापूर्वी स्थगित झालेल्या जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींना नव्या वर्षात नवे कारभारी लाभणार आहेत. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित होणाऱ्या राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींबरोबरच जिल्ह्यातील   ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. आयोगाच्या कार्यक्रमानुसार येत्या १५ डिसेंबर रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील,

दि. २३ ते ३० या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. ३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी, ४ जानेवारीला अर्ज माघारी घेता येणार आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्हे वाटप केली जाणार आहेत. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. १८ रोजी मतमोजणी केली जाईल असा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक