शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार ग्राहक महावितरणला स्वत: पाठवितात मीटर रीडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 15:36 IST

कोरोना संसर्गाच्या कालावधीत प्रत्यक्ष वीज मीटर रीडिंग न घेता महावितरणकडून सरासरी वीजबिले ग्राहकांना पाठविली जात आहेत. ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने मीटर रीडिंग पाठविण्याचे आवाहन केले आहे

ठळक मुद्देऑनलाईन सुुविधा : एका महिन्यात ४० टक्के ग्राहकांची वाढऑनलाईन पद्धतीने मीटर रीडिंग पाठविण्याचे आवाहन

नाशिक : कोरोनामुळे महावितरणकडून मीटर रीडिंग घेतले जात नसल्याने ग्राहकांनी आपल्या वीज मीटरचे रीडिंग स्वत: महावितरणला पाठवावे, असे आवाहन करीत ऑनलाईन यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून नाशिक परिमंडलातील सुमारे ३० हजार ग्राहक महावितरणला आपले स्वत:चे वीज मीटर रीडिंग ऑनलाईन पाठवित आहेत. विशेष म्हणजे एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात आठ हजार ग्राहक ऑनलाईन आले आहेत.कोरोना संसर्गाच्या कालावधीत प्रत्यक्ष वीज मीटर रीडिंग न घेता महावितरणकडून सरासरी वीजबिले ग्राहकांना पाठविली जात आहेत. ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने मीटर रीडिंग पाठविण्याचे आवाहन केले आहे. महावितरणने दिलेल्या सुविधांचा वापर करीत स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठविण्यास महावितरणच्या वीज ग्राहकांकडून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असून नाशिक परिमंडलात गेल्या एप्रिल महिन्यात २२,३३० ग्राहकांनी मोबाईल ॲप, वेबसाईट व ह्यएसएमएसह्णद्वारे मीटरचे रीडिंग महावितरणकडे पाठविले होते, तर मे महिन्यात यामध्ये आठ हजारांनी वाढ होऊन रीडिंग पाठविण्यामध्ये नाशिक परिमंडलातील ३०,१४२ वीज ग्राहकांचा समावेश झाला आहे.वीजग्राहकांना विविध प्रकारे स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीत आता मोबाईल ह्यएसएमएसह्णद्वारे देखील मीटर रिडींग पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणbillबिल