शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपावर टीका करणाऱ्या सेना नगरसेवकावर वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 20:00 IST

नाशिक : अयोध्येत राममंदिराचे बांधकाम तर नाहीच शिवाय शहरातील मंदिरे पाडल्यास भाजपाच्या कोणत्याही उमेदवाराने मत मागण्यास येऊ नये ही ...

ठळक मुद्देधार्मिक स्थळांचा प्रश्न : ढगे यांच्या नावाचे फलक हटविले

नाशिक : अयोध्येत राममंदिराचे बांधकाम तर नाहीच शिवाय शहरातील मंदिरे पाडल्यास भाजपाच्या कोणत्याही उमेदवाराने मत मागण्यास येऊ नये ही नाशिकरोड येथील नगरसेवक यांची टीका भाजपाला झोंबली असून, हा फलक तर महापालिकेने काढून नेलाच, शिवाय ढगे यांच्या निवासस्थानाकडे जाण्याबाबत असलेले दिशादर्शक फलक गुरुवारी (दि.१५) तातडीने हटविले.शहरातील सुमारे ५७५ बेकायदा धार्मिक स्थळे महापालिका प्रशासन हटविणार आहे. सदरची धार्मिक स्थळे केवळ २००९ पूर्वी असल्याचा पुरावा नाही म्हणून हटविण्यात येत असल्याने शहरात नाराजीचे वातावरण आहे. २००९ नंतरची खुल्या जागेत बांधलेली ७२ धार्मिक स्थळे असून, ती हटविण्याबाबतदेखील कार्यवाहदेखील होणार आहे तूर्तास न्यायालयाच्या आदेशामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी गेल्या दोन महिन्यांत हा विषय शहरात खूपच गाजला होता. महापालिकेत आणि राज्यात इतकेच नव्हे दर देशात भाजपाची सत्ता असतानादेखील मंदिरे हटविली जात असल्याने नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक १७ मधील शिवसेना नगरसेवक यांनी मंदिर पाडल्यास भाजपाच्या कुठल्याही उमेदवाराने भविष्यात मदत मागण्यास येऊ नये अशाप्रकारचा फलक लावला होता. त्यामुळे संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सांगून हा फलक हटविला. आता त्यापुढे जाऊन महापालिका प्रशासनाने ढगे यांच्या निवासस्थानी असलेला निवासस्थानाकडे जाणारा दिशादर्शक फलकच हटविला आहे.शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत, फलक आणि राजकीय फलकदेखील आहेत. मात्र ते हटविण्याचे सोडून केवळ एका अधिकृत नगरसेवकाच्या घराबाबत आणि तेही महापालिकेनेच लावलेले दोन दिशादर्शक फलक काढून घेण्याचे कारण काय? असा प्रश्न ढगे यांनी केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकMuncipal Corporationनगर पालिका