शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आठवडे बाजार अखेर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 16:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शेताच्या बांधावरून शेतकऱ्यांमार्फत विना मध्यस्थ थेट नागरिकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य ...

ठळक मुद्दे कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेताच्या बांधावरून शेतकऱ्यांमार्फत विना मध्यस्थ थेट नागरिकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्यावतीने शहरात सुरू करण्यात आलेला शेतकरी आठवडे बाजार अखेर बंद झाला आहे. प्रारंभीपासून स्थानिक भरेकºयांकडून होणारा विरोध तसेच जवळच भरविण्यात आलेला बाजार यामुळे अखेर या बाजाराला घरघर लागली आणि सदर बाजार बंद पडला.शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत दर शुक्रवारी ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरत होता. पांजरापोळ संस्थची जागा नोंदणीकृत शेतकºयांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. शेतकरी या ठिकाणी आपला शेतमाला आणून वाजवी दरात विक्री करीत होते. परंतु त्यास सुरूवातीपासून भरेकºयांचा विरोध होता. बाजारात त्यांनी धुडगूसही घातला होता.

‘आठवडे बाजाराची’ कल्पना ग्राहकांना ताजा आणि वाजवी दरात भाजीपाला मिळावा याबरोबरच शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘आठवडे बाजाराची’ कल्पना होती. बाजारात थेट शेतीच्या बांधावरून शेतमाल कुठल्याही मध्यस्थ, व्यापारी अथवा किरकोळ विक्रेत्यांमार्फत बाजारात आणला जात होता. शेतकरी स्वत: बाजारात शेतमालाच्या विक्रीसाठी बसत होते. कृषी पणन मंडळाने यासाठी त्यांना स्टॉल्स देऊ केले होते. तसेच नोंदणीकृत शेतकºयांना ओळखपत्रही दिले होते. कृषी पणन मंडळाने पुढाकार घेऊन शेतकºयांसाठी ‘शेतकरी आठवडे बाजार’ सुरू केला होता. सुरूवातील या बाजाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारात गर्दी होऊ लागल्याने स्थानिक भरेकºयानी आठवडे बाजार उलथून टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर बाजार नेहमीच दहशतीच्या सावटात होता.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी