शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

राष्ट्रवादी  जिल्हाध्यक्ष पदासाठी भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:20 AM

राष्ट्रवादी  काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्षांसह सहा जणांनी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठीची चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेट्ये यांच्यासह अनेक दिग्गज असल्याने संभाव्य गटबाजी टाळण्यासाठी अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्याचा निर्णय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आहे.

ठळक मुद्देनिर्णय प्रदेशकडे : श्रेष्ठींच्या निर्णयाचे समर्थन करण्याचा ठराव

नाशिक : राष्ट्रवादी  काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्षांसह सहा जणांनी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठीची चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेट्ये यांच्यासह अनेक दिग्गज असल्याने संभाव्य गटबाजी टाळण्यासाठी अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्याचा निर्णय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीअंतर्गत रविवारी राष्ट्रवादी  भवन येथे जिल्हाध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. विद्यमान जिल्हाध्यक्षांसह राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्ये यांनीही जोरदार तयारी केल्यामुळे चुरस अधिक वाढली आहे. याबरोबरच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादी  युवकचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वाजे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, कोंडाजीमामा आव्हाड आणि सचिन पिंगळे यांचीही नावे जिल्हाध्यक्षपदासाठी पुढे आली आहेत.जिल्हाध्यक्षपसाठी जोरदार फिल्ंिडग लावण्यात आल्यामुळे अनेक दावे, प्रतिदावे आणि तक्रारींचा सूरही इच्छुकांमध्ये उमटला. विद्यमान जिल्हाध्यक्षांविषयीदेखील मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्याचे समजते. तर एका गटाने ओबीसी चेहऱ्याला संधी देण्याबाबतचा युक्तिवाद केला. हा सारा घटनाक्रम आणि इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी यामुळे दोनदा विचारविनीमय करूनही कोणत्याही एका नावावर एकमत होऊ शकले नाही. अखेर निवडणूक निरीक्षक अविनाश अधिक यांनी इच्छुकांच्या नावांवर प्रदेशमध्येच चर्चा होऊन प्रदेशपातळीवरून जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे जाहीर करून श्रेष्ठींकडून येणाºया नावाला सर्वांनी समर्थन द्यावे असा ठरावच केला.--इन्फो--इच्छुकांचे शक्तिप्रदर्शनराष्ट्रवादी  कॉँग्रेसच्या कार्यालयात जिल्हाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत हजेरी लावली. यंदा इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गटबाजीचीदेखील शक्यता बळावल्याने पक्षापुढेदेखील सर्वसंमतीचा जिल्हाध्यक्ष निवडीचे आव्हान असणार आहे.--इन्फो--विद्यमान जिल्हाध्यक्षांविषयी तक्रारीविद्यमान जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी जिल्ह्यात विविध प्रश्नांवर वेळोवेळी रस्त्यावर उतरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतरही त्यांच्याविषयी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक निरीक्षकांकडे तक्रारी केल्याचे बोलले जात आहे. त्यातच अनेक दिग्गज जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असून, काहींनी वरूनच मोर्चेबांधणी केल्यामुळे विद्यमान जिल्हाध्यक्ष पगार यांच्यापुढे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. किंबहूना यंदा नवीन चेहºयाला संधी देण्याबाबतच सर्वसंमती झाल्याचेही समजते. त्यामुळे पगार यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण