शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा रुग्णालयात  आता रुग्णांचे ‘ट्रॅक रेकॉर्ड’ संगणकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:15 IST

महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सर्व नोंदणी, त्याला दिली जाणारी औषधे तसेच करण्यात येणाºया तपासण्या या सर्वांची नोंद आता संगणकावर नोंदवली जाणार आहे.

नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सर्व नोंदणी, त्याला दिली जाणारी औषधे तसेच करण्यात येणाºया तपासण्या या सर्वांची नोंद आता संगणकावर नोंदवली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होते काय आणि त्यांनी काय तपासणी केली येथून ते औषधे कोणती दिली आणि साठा असून, नाही सांगितला काय इतकेच नव्हे तर सोनोग्राफी, एक्स-रे तपासणी केली किंवा कसे याबाबतची सर्व माहिती आॅनलाइन करणार आहे. हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून ही व्यवस्था होणार आहे.महापालिकेचा वैद्यकीय विभाग असाच तंत्रज्ञानापासून दूर असल्याने त्यात सावळा गोंधळ असतो. रुग्णांच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविषयी तक्रारी, औषधांची मागणी आणि पुरवठा यातील तफावत हे महापालिकेतील नेहमीचेच मुद्दे असतात. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या सॉफ्टवेअरची चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी दोनशे संगणक संचाची मागणीदेखील नोंदविण्यात आली आहे.महापालिकेच्या रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर त्याची नोंदणी होईल. संबंधित वैद्यकीय अधिकाºयाकडे गेल्यानंतर त्याची होणारी तपासणी, केलेले उपचार आणि औषधे याची नोंद संबंधित वैद्यकीय अधिकारी आपल्या संगणकावर करेल. वैद्यकीय अधिकाºयाने त्या रुग्णास सोनोग्राफी किंवा एक्स-रे काढण्यास सांगितले की, तशी नोंद त्याला संगणकावर करावी लागेल आणि त्यानंतर महापालिकेच्या संबंधित क्ष किरण तज्ज्ञ किंवा रेडिओलॉजीस्टच्या संगणकावर याबाबतची माहिती दिसेल त्या अनुषंगाने तो तपासणी करेल अन् त्याचीदेखील नोंद होईल. त्याचप्रमाणे औषधांचीदेखील माहिती संगणकावर असेल.महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाºयांच्या कामकाजाबाबत नगरसेवकांच्या तक्रारी असून, ते कार्यालयात उपलब्ध नसतात किंवा रुग्ण अन्यत्र पाठवले जातात, त्यासाठी अनेक प्रकारची कारणे दिली जातात. परंतु आता मात्र रुग्ण आल्यानंतर त्याला नक्की काय झाले, आजार किती गंभीर होता म्हणून सुविधा असलेल्या महापालिकेच्या अन्य किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. या सर्वांचीच माहिती उपलब्ध असणार आहे. अर्थात, हे आधुनिकीकरण करण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी कितपत साथ देतात, यावर त्याचे यश अवलंबून आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल