शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आता राज्यराणी एक्स्प्रेसही पळविली नांदेडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 01:13 IST

मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेड-मुंबई अशी चालविण्यास रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखविल्याने मुंबई-ठाणे जाणाऱ्या नाशिककर रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून तपोवन, नाशिक-पुणे एक्स्प्रेस व आता राज्यराणी एक्स्प्रेसचादेखील मार्ग वाढविल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देनाशिककरांवर अन्याय : नाशिक-पुणे एक्स्प्रेसनंतर रेल्वे मंत्रालयाकडून पुन्हा निर्णय

नाशिकरोड : मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेड-मुंबई अशी चालविण्यास रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखविल्याने मुंबई-ठाणे जाणाऱ्या नाशिककररेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून तपोवन, नाशिक-पुणे एक्स्प्रेस व आता राज्यराणी एक्स्प्रेसचादेखील मार्ग वाढविल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.मुंबई-ठाणे परिसरात दररोज ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या वाढल्याने पंचवटी एक्स्प्रेसला समांतर रेल्वे सुरू करण्याची नाशिककर प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी होती. ९ मार्च २०१२ रोजी मनमाड-एलटीटी राज्यराणी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. प्रवाशांच्या मागणीनंतर राज्यराणी एक्स्प्रेस सीएसटीपर्यंत धावत आहे. मात्र राज्यराणी एक्स्प्रेसला दादरला थांबा देण्यात यावा व तिची परतीची वेळ बदलण्यात यावी या मागणीकडे रेल्वे मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे नाशिककर रेल्वे प्रवाशांची दादर थांबा नसल्याने व वेळेमुळे परतीची गैरसोय तशीच आहे. राज्यराणी एक्स्प्रेस तोट्यात असल्याच्या कारणावरून यापूर्वीच राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड-मुंबई करण्याचा रेल्वे मंत्रालयाकडून घाट घालण्यात आला होता. मात्र खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार योगेश घोलप, अनिल कदम यांनी राज्यराणी ही मनमाड-मुंबई अशीच ठेवावी, अशी मागणी लावून धरली होती. नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड-मुंबई सोडावी, अशी मागणी केली होती. राज्यराणी एक्स्प्रेस तोट्यात असल्याचे कारण पुढे करून रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड-मुंबई धावण्यास सोमवारी (१६ डिसेंबर) मंजुरी दिली आहे. राज्यराणी एक्स्प्रेस नांदेडकडूनच हाउसफुल्ल होऊन आल्यास नाशिककर रेल्वे प्रवाशांना त्यामध्ये जागा मिळणार नाही. त्यामुळे पुन्हा पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेसवरील प्रवाशांचा ताण वाढणार आहे. यामुळे नाशिककर रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.तपोवन एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर मनमाड-सीएसटी अशी धावत होती. मात्र काही वर्षानंतर नाशिककरांकडून तपोवन एक्सप्रेस हिरावून घेत ती नांदेड-मुंबई करण्यात आली. काही वर्षांपूर्वी नाशिक-पुणे गाडी सुरु करण्यात आली. या गाडीला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता ती भुसावळहून सोडली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तांत्रिक कामामुळे भुसावळ-पुणे एक्स्प्रेस ही नाशिक ऐवजी मनमाड-दौंडमार्गे धावत आहे. यामुळे नाशिककरांना पुण्याला रस्तामार्गे जाण्याची वेळ आल्याने पैसे व वेळेचा अपव्यय होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे