शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

...आता होर्डिंग्जकरिता लागणार पोलिसांची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 01:15 IST

शहरात मनपा प्रशासनाने निश्चित करून दिलेल्या जागांवर होर्डिंग्ज लावण्याकरिता पोलीस आयुक्तालयाकडून पूर्व परवानगी मिळविणे आवश्यक राहणार आहे. आयुक्तालयाच्या मंजुरीशिवाय होर्डिंग्ज झळकविल्यास संबंधितांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिला आहे. याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देलवकरच अधिसूचना : मनपाकडून अर्ज अंतिम मंजुरीसाठी पाठविला जाणार आयुक्तालयाकडे

नाशिक : शहरात मनपा प्रशासनाने निश्चित करून दिलेल्या जागांवर होर्डिंग्ज लावण्याकरिता पोलीस आयुक्तालयाकडून पूर्व परवानगी मिळविणे आवश्यक राहणार आहे. आयुक्तालयाच्या मंजुरीशिवाय होर्डिंग्ज झळकविल्यास संबंधितांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिला आहे. याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सव, आगामी नवरात्रोत्सव, दीपावली तसेच महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता शहरात फलकबाजीला उधाण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे फलकबाजीवर नियंत्रण रहावे आणि कुठल्याहीप्रकारे कोणीही कोणाविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर अथवा चित्र असलेले फलक शहरात लावू नये, जेणेकरून कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल, यासाठी मनपा प्रशासनाने जाहिरातीसाठी परवानगी देताना संबंधित जाहिरातकर्त्याचा आलेला अर्ज व जाहिरातीचा आशय मंजुरीसाठी अगोदर पोलीस आयुक्तालयाकडे पाठविणे बंधनकारक राहणार आहेे. राजकीय, सामाजिक, व्यावसायिक अशा कुठल्याही प्रकारचे जाहिरात होर्डिंग्ज झळकविण्यापूर्वी पोलीस परवानगी बंधनकारक करण्यात येणार आहे.

होर्डिंग्ज लावताना त्यावर दर्शनी भागात मनपा, पोलीस यांचा परवानगी क्रमांकदेखील लिहिणे बंधनकारक राहणार आहे, अन्यथा सदर होर्डिंग्ज हे बेकायदेशीर समजण्यात येईल आणि मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून ते तत्काळ काढून नष्ट केले जाईल, तसेच पोलीस आयुक्तालयाकडून अशा व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही पाण्डेय म्हणाले. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होण्यास आळा बसेल तसेच अयोग्य होर्डिंग्ज शहरात झळकलेले पहावयास मिळणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याबाबत आयुक्तालयाकडून मनपा प्रशासनासोबत पत्रव्यवहार करण्यात आला असून, होर्डिंग्जच्या अधिकृत जागांची यादीदेखील मागविण्यात आल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.

--इन्फो--

मनपा निवडणूक होईपर्यंत ‘चमकोगिरी’ला चाप

शहरात होर्डिंग्ज लावण्यापूर्वी पोलीस आयुक्तालयाकडून परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या दोन दिवसांत आयुक्तालयाकडून काढली जाण्याची शक्यता आहे. होर्डिंग्जबाबतचा आदेश मनपा निवडणूक पार पडेपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शहरात आता ‘भाऊ’, ‘दादा’, ‘अण्णा’ यांची चमकोगिरीला चाप बसणार आहे.

--कोट--

शहराच्या कायदासुव्यवस्थेच्यादृष्टीने होर्डिंग्जचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या सुरू असलेला सणासुदीचा काळ, आगामी मनपा निवडणूक यामुळे होर्डिंग्ज लावण्याची परवानगी देण्यापूर्वी मनपाकडून संबंधितांचे अर्ज आयुक्तालयाकडे पाठविले जातील, आयुक्तालयाकडून फलकावर प्रदर्शित करावयाच्या मजकुराची शहानिशा करून योग्य ती खात्री करून परवानगी दिली जाईल. संबंधितांना परवानगी क्रमांक दिलेला असेल, तो त्याने त्याच्या होर्डिंग्जवर प्रदर्शित करणे अनिवार्य राहणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या दोन दिवसांत जारी केली जाणार आहे.

-दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयSocialसामाजिक