शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

आता मराठा क्रांती मोर्चाची नाशिकमध्ये बिगर राजकीय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:16 IST

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात पेटलेल्या आंदोलनाची दाहकता वाढत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिकमधील आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बिगर राजकीय समिती स्थापन करण्याचा निर्णय गुरुवारी (दि.२) झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देसमन्वय बैठकीत निर्णय : राजकीय व्यक्तींनी पाठिंबा देण्याचा ठराव

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात पेटलेल्या आंदोलनाची दाहकता वाढत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिकमधील आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बिगर राजकीय समिती स्थापन करण्याचा निर्णय गुरुवारी (दि.२) झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्'ातील आंदोलनाला दिशा देण्यासोबतच राज्यभरातही अशाच प्रकारे नियोजन समिती स्थापन करून आंदोलनाला चेहरा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, नाशिक मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत आंदोलन करणाºया काही आंदोलकांनी यापुढील आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्याकडे सोपविल्याने आंदोलनात दुहीचे बिजारोपण होण्याची लक्षणे दिसून आली आहेत.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात ५७ मोर्चे निघाल्यानंतर मुंबईमध्ये ५८वा मराठा समाजाचा मूक क्रांती मोर्चा कोणत्याही चेहºयाशिवाय यशस्वी झाला. परंतु, नेतृत्वाशिवाय कोणताही लढा यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे आता आरक्षणासंदर्भात सरकारशी चर्चा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाला चेहरा प्राप्त करून देणे गरजेचे सांगत नाशिक जिल्'ात बिगर राजकीय व्यक्तींच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.या समितीच्या माध्यमातून जिल्हाभरातील आंदोलनाचे नेतृत्व व नियोजन करण्यात येणार असून, या बिगर राजकीय नियोजन समितीच्या समन्वयकांमध्ये चंद्रकांत बनकर आणि अ‍ॅड. श्रीधर माने यांच्यासह आणखी काही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे. या समितीच्या पाठीमागे राजकीय व्यक्तींनीही सक्रिय राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा सुरू ठेवण्यासोबत राजकीय लढा देण्यासाठी संपूर्ण ताकद लावण्यासाठी समाजाने एकत्रित लढण्याची गरज व्यक्त करतानाच प्रसंगी उच्च न्यायालयात समाजाची बाजू मांडण्यासाठी मराठा समाजाच्याच तज्ज्ञ वकिलाची नेमणूक करण्याचा विचारही या बैठकीत पुढे आला.दरम्यान, आंदोलनाची धग कायम ठेवतानाच तालुकास्तरीय आंदोलनाचे नियोजन व समन्वय साधण्यासाठी तालुकास्तरीय समिती नेमण्याचा विचार समाजातील काही नेत्यांनी मांडला.या बैठकीप्रसंगी आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या मुलांनीही सहभाग घेत हातात फलक घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी केली. सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळीनाशिक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनापासून समाजातील राजकीय नेते दूर असल्याची चर्चा होत असताना गुरुवारी झालेल्या बैठकीत समाजातील बव्हंशी राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. यात नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, माजी आमदार माणिकराव कोकाटे, शिरीष कोतवाल, अपूर्व हिरे, नितीन भोसले,तसेच सुनील बागुल, विजय करंजकर, निरंजन ठाकरे, शरद कोशिरे, माजी महापौर दशरथ पाटील, प्रकाश मते, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, शाहू खैरे, विलास शिंदे, शिवाजी सहाणे, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, निवृत्ती अरिंगळे, अमृता पवार, डॉ. सुनील ढिकले, नाना महाले, सचिन पिंगळे, अनिल भालेराव, हर्षदा गायकर, माधवी पाटील, पूजा धुमाळ, अस्मिता देशमाने, गोकुळ पिंगळे, केशव पाटील, विष्णुपंत म्हैसधुणे, आशिष हिरे, सचिन मराठे, महेश बिडवे, शरद देवरे, डॉ. संदीप कोतवाल आदीनी सहभागी होत जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.आंदोलनात दुहीची लक्षणेमराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातील दुसºया टप्प्यातील मोर्चात आतापर्यत ठोक मोर्चा व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणारे कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी यापुढील आंदोलनाचे नेतृत्व नाशिकच्या शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बागुल यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी जिल्हास्तरीय बैठकीत यातील काही महिलांनी आतापर्यंच्या आंदोलनात पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले असताना समाजाचे नेते कोठे होते, असा सवालही उपस्थित केला होता.