शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जात पडताळणी आता आणखी सुकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 15:01 IST

अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचे जात पडताळणी प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केल्यास पंधरा दिवसात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देरक्तसंबंधाचा पुरावा महत्वाचा : पंधरा दिवसात निर्णयजिल्हास्तरीय जात पडताळणी समितीकडे हजारो जात पडताळणी प्रमाणपत्रांचे प्रकरणे वर्षानुवर्षे पडून

 

नाशिक : जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी वर्षानुवर्षे वाट पाहण्याची यापुढे गरज भासणार नाही, त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने दोन दिवसांपुर्वी राजपत्र प्रसिद्ध करून, अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचे जात पडताळणी प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केल्यास पंधरा दिवसात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. सामजिक न्याय विभागाच्या या निर्णयामुळे विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.राज्यातील सर्वच जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीकडे हजारो जात पडताळणी प्रमाणपत्रांचे प्रकरणे वर्षानुवर्षे पडून असून, प्रत्येक वेळी अर्जदाराकडून नव नवीन कागदपत्रांची तसेच पुराव्यांची मागणी करून प्रकरणे प्रलंबीत ठेवण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. सर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही समाजकल्याण विभागाकडून समितीच्या बैठका घेण्यास विलंब लावला जातो, बैठक झालीच तर या बैठकीसाठी समिती सदस्यच गैरहजर राहत असल्यामुळे प्रकरणांवर निर्णय घेतला जात नसल्यामुळे शालेय विद्यार्थी, पालक, शासकीय नोकरदार, राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. अशा प्रलंबीत प्रकरणांमुळेच समाज कल्याण विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांकडून पैशांची मागणीचे प्रकार घडत असल्याने त्यावर सामाजिक न्याय विभागाने अखेर तोडगा काढला आहे. या संदर्भातील महाराष्टÑ अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग अधिनियमात दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, पडताळणी समितीने दिलेले अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडीलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास सदर वैधता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा मानून इतर कोणत्याही पुराव्याची मागणी न करता सक्षम प्राधिकाºयाने जातीचे प्रमाणपत्र निर्गमीत करावे. त्याचबरोबर अर्जदाराने पडताळणी समितीने निर्गमीत केलेले अर्जदाराच्या रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास सक्षम प्राधिका-याने इतर कागदपत्रांची किंवा पुराव्याची मागणी न करता संबंधित अर्जदाराने सादर केलेले वैधता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा मानून जात प्रमाणपत्र निर्गमीत करावे.जात पडताळणी समितीला आवश्यकता वाटल्यास अर्जदाराकडे मुळ कागदपत्रांची मागणी करू शकतील, मात्र असे कागदपत्रे अर्जदाराने सादर केल्यास पंधरा दिवसात जिल्हा जात पडताळणी समिती त्यावर निर्णय घेऊन पडताळ णी प्रमाणपत्र अदा करतील असेही शासनाने आदेशात म्हटले असून, ज्या अर्जावर आक्षेप घेतला गेला त्या अर्जावरही ६० दिवसाच्या आत कार्यवाही करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रMantralayaमंत्रालय