शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

आता वनविकास महामंडळकडूनच ‘लेझर शो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:14 IST

पांडवलेणी येथील नेहरू वनोद्यानातील बोलक्या वृक्षांचा लेझर शो आता वनविकास महामंडळाच्या कर्मचाºयांकडूनच चालवला जाऊ लागला असून, त्यामुळे कंत्राटदार कंपनीला द्यावयाचे लाखो रु पये वाचणार आहेत. महामंडळाच्या पाच कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे. त्यांनी पूर्वीच ठरल्याप्रमाणे एक मार्चपासून शो आॅपरेटर करणे सुरू केले आहे.

पाथर्डी फाटा : पांडवलेणी येथील नेहरू वनोद्यानातील बोलक्या वृक्षांचा लेझर शो आता वनविकास महामंडळाच्या कर्मचाºयांकडूनच चालवला जाऊ लागला असून, त्यामुळे कंत्राटदार कंपनीला द्यावयाचे लाखो रु पये वाचणार आहेत. महामंडळाच्या पाच कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे. त्यांनी पूर्वीच ठरल्याप्रमाणे एक मार्चपासून शो आॅपरेटर करणे सुरू केले आहे. टाटा ट्रस्टच्या मदतीने नाशिक मनपा व वनविकास महामंडळ यांच्या सयुंक्त विद्यमाने नेहरू वनोद्यानात बोलक्या वृक्षांचा लेझर शो सव्वा वर्षांपूर्वी साकारण्यात आला; पुण्याच्या गार्डियन कंपनीला एका वर्षाचा करार करून तो चालविला जात होता. डिसेंबरअखेर करार संपल्यानंतर कंपनीने शो आॅपरेट करणे बंद केले होते.  एक महिनाभर शो बंद राहिल्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी वनविकास महामंडळाच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन महामंडळाच्याच कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन शो चालविण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी गार्डियन कंपनीच्या तंत्रज्ञानी एक महिन्यात प्रशिक्षण देऊन बाहेर पडावे असे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे महिन्यानंतर एक फेब्रुवारीला शो पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आला.  या एक महिन्यात महामंडळाच्या पाच कर्मचाºयांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ठरल्याप्रमाणे करारदार कंपनीचे कर्मचारी फेब्रुवारीअखेर माघारी गेले आहेत. त्यांना देण्यात  येणार लाखो रु पयांचा मोबदल्याचा खर्च वाचणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक