शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

...आता मेनरोड बाजारपेठेतील जोडरस्तेही सील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 01:24 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलिसांनी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोड भागाचा परिसर संपूर्णपणे  नियंत्रणाखाली आणला आहे. रविवारी दिवसभरात मेन रोड बाजारपेठेकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यांसह सर्व लहान गल्ली-बोळांच्या ‘चोरवाटा’देखील पोलिसांनी बल्ली बॅरिकेडिंग करून बंद केल्यामुळे मेन रोड बाजारपेठेत अवैध प्रवेशाचा ‘मार्ग’ बंद झाला आहे.  

ठळक मुद्देबल्ली बॅरिकेडिंग : अवैध प्रवेशाला बसणार चाप !

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलिसांनी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोड भागाचा परिसर संपूर्णपणे  नियंत्रणाखाली आणला आहे. रविवारी दिवसभरात मेन रोड बाजारपेठेकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यांसह सर्व लहान गल्ली-बोळांच्या ‘चोरवाटा’देखील पोलिसांनी बल्ली बॅरिकेडिंग करून बंद केल्यामुळे मेन रोड बाजारपेठेत अवैध प्रवेशाचा ‘मार्ग’ बंद झाला आहे.  मेन रोड बाजारपेठेत सोमवार ते शुक्रवारपर्यंत तोबा गर्दी उसळते. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. शनिवारपासून पोलिसांनी या संपूर्ण बाजारपेठेचे बारकाईने निरीक्षण करीत मुख्य रस्त्यांसह अनावश्यक एंट्री पॉइंट बंद केले. तसेच घुसखोरी टाळण्यासाठी लहान गल्लीबोळासुद्धा लाकडी बल्ली लावून बंद केल्या आणि जेथे शक्य आहे तेथे लोखंडी मोठ्या बॅरिकेडचा वापर करण्यात आला आहे. एकूणच कुठल्याही रस्त्याने मेन रोड बाजारात नागरिक टोकन न घेता घुसखोरी करणार नाही, याची पूर्ण खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. पोलिसांनी निश्चित केलेल्या एन्ट्री पॉइंटवरूनच नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून मिळणारे मोफत टोकन घेणे अत्यावश्यक राहणार असल्याचे आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.....पास वाटपाचा रविवारमेनरोड बाजारपेठेत एन्ट्री पॉईंटवरून केवळ व्यावसायिक व त्यांच्याकडे काम करणारे कामगार आणि ग्राहकांनाच प्रवेश दिला जाईल. रविवारी दिवसभर पोलिसांनी व्यावसायिकांना टप्प्याटप्प्याने बोलावून पासचे वाटप केले. पास असलेल्या कामगारांनाच प्रवेश दिला जाणार असून, विनाटोकन अथवा विनापास प्रवेश करताना आढळून आल्यास थेट ५०० रुपयांचा दंड पोलिसांकडून केला जाणार आहे.  ...या भागात ‘एन्ट्री पॉइंट’बाजारपेठेतील वावरे लेन (नेपाळी कॉर्नर), नवापुरा, भद्रकाली-बादशाही कॉर्नर, धुमाळ पॉइंट (दहीपूल), बोहरपट्टी कॉर्नर आणि रेडक्रॉस सिग्नल या ठिकाणी पोलिसांनी तंबू ठोकले आहेत. प्रत्येक ‘पॉइंट’जवळ ‘सुरक्षित सामाजिक अंतरा’चे पालन करण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली आहेत. ग्राहकांना सोमवारीमोफत कूपन घेत बाजारपेठेत प्रवेश करावा लागेल.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस