शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता झाड तोडल्यास दहा हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 01:03 IST

नाशिक : शहरात बेसुमार वृक्षतोड सुरू असून, अनेक जण फौजदारी कारवाईलाही घाबरत नाहीत, त्यामुळे आता संरक्षित सूचीतील झाडे तोडल्यास दहा हजार रुपये तर संरक्षकसूचीत नसलेली झाडे तोडल्यास दहा हजार रुपये याप्रमाणे दंडही करण्याचा निर्णय बुधवारी (दि.९) झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देमनपा आक्रमक: रस्त्यातील २९ धोकादायक झाडांचे होणार पुनर्रोपण

नाशिक : शहरात बेसुमार वृक्षतोड सुरू असून, अनेक जण फौजदारी कारवाईलाही घाबरत नाहीत, त्यामुळे आता संरक्षित सूचीतील झाडे तोडल्यास दहा हजार रुपये तर संरक्षकसूचीत नसलेली झाडे तोडल्यास दहा हजार रुपये याप्रमाणे दंडही करण्याचा निर्णय बुधवारी (दि.९) झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून गंगापूर रोड, तसेच दिंडोरी रोडवर रस्त्याच्या मधोमध असलेली झाडे तोडण्यात असलेला विरोध कमी झालेला नसला, तरी न्यायालयाच्या परवानगीने आता ही २९ धोकादायक झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा आयुक्त कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. नाशिक शहरात वृक्षतोड करताना महापालिकेची परवानगी घेतली जात नाही, तसेच महापालिकेने कारवाई केली, तरी उपयोग होत नाही. उद्यान विभागाकडून पोलिसांत तक्रार केली जाते, परंतु त्याचे पुढे काहीच होत नाही. त्यामुळे फौजदारी कारवाईबरोबरच आता आर्थिक दंड करण्यात येणार आहे. वड, पिंपळासारखे १८ वृक्ष शासनाच्या अनुसूचित म्हंणजेच संरक्षित यादीत असून, त्यांची तोड केल्यास फौजदारी कारवाईबरोबरच दहा हजार रुपये दंड करण्यात येईल, तर जे वृक्ष संरक्षित वृक्षांच्या यादीत नाहीत, ते तोडल्यास फौजदारी कारवाईबरोबरच पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले यांनी दिली.नाशिक शहरात यापूर्वी कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्ता रुंदीकरण करत असताना, वृक्षतोड केल्याने मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. रस्त्याच्या मधोमध असलेले वड, पिंपळासारखे पाच प्रमुख प्रजातींचे वृक्ष तोडू नयेत, अशा प्रकारचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यावर दोन टोकाची मते व्यक्त होत होती. मात्र, आता अशा २९ झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बैठकीत प्रा.वर्षा भालेराव, ॲड.अजिंक्य साने, खाडे यांच्यासह अन्य सदस्य व अधिकारी उपस्थित होते.महापालिकेकडे बिल्डिंग प्लॅन मंजुरीसाठी आल्यानंतर, त्यावरील झाडे तोडण्यास परवानगी देण्यापूर्वी नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहाणी करावी आणि तसा अहवाल सादर करावा, असा निर्णय घेण्यात आला.शासकीय कार्यालयांना त्यांच्या जागेवरील वृक्षतोड करायची असल्यास, महापालिकेला खासगी व्यक्ती किंवा संस्थांप्रमाणेच पाच हजार रुपये महापालिकेला भरणे आवश्यक नाही. मात्र, त्यांनी वृक्ष तोडण्याचा खर्च महापालिकेस द्यावा, असा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCrime Newsगुन्हेगारी