शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
4
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
5
तीन सरकारी बस एकमेकांवर घडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
6
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
7
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
8
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
9
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
10
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
11
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
12
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
13
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
14
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
15
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
16
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
17
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
18
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
19
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
20
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...

...आता भगूर गावातसुध्दा कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 17:51 IST

महिलेच्या विंचुरीदळवी येथील शेतावर नुकताच लग समारंभ झाला होता आणि त्याचवेळी मुंबई, पनवेल येथील नागरिक या महिलेच्या संपर्कात आल्यानंतर महिलासुध्दा कोरोनाबाधित झाल्याची चर्चा आहे.

नाशिक : शहराच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता उद्रेक आता थेट नाशिक शहराजवळच असलेल्य भगूरगावातसुध्दा जाऊन पोहचला आहे. यामुळे भगुरवासीयांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. भगूर गावातील एक महिला व पुरूष प्रथमच कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रशासनाने आपला मोर्चा आता भगूरकडे वळविला आहे.भगूर गावातील गणपती मंदिराजवळील ६० वर्षीय महिला आणि राममंदिररोड तेलीगल्ली येथील ५2 वर्षीय पुरु ष असे दोन प्रथमच करु ना बांधीत निघाल्याने नागरिक दक्षता बाळगत सतर्क झाले आहे. भगुर पालिका मुख्यधिकारी प्रतिभा पाटील आरोग्यसेवक एस.एन.शेख, रमेश राठोड. सफाई प्रमुख परशुराम कुटे आदिंनी कोरोनाबाधित महिलेच्या घराची पाहणी करु न परीसरातील ५००मीटरचा परिसर ‘सील’ केला आहे. घरातील सदर महिलेचे जवळचे सेवेकरीसह चार व्यक्तीना देवळाली छावणी परीषदेच्या दवाखान्यात विलगीकरण करण्यात आले आहे. भगुरमध्ये आज प्रथमच दोन कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे शासकीय लॉकडाऊन नियमांची आता भगूर गावातसुध्दा काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.दरम्यान, महिलेच्या विंचुरीदळवी येथील शेतावर नुकताच लग समारंभ झाला होता आणि त्याचवेळी मुंबई, पनवेल येथील नागरिक या महिलेच्या संपर्कात आल्यानंतर महिलासुध्दा कोरोनाबाधित झाल्याची चर्चा आहे. दुसरा कोरोनाबाधित पुरु ष मुंबई येथे नोकरीला असल्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाली असावी, असे बोलले जात आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस