शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता चर्चा महापौरपदाच्या उमेदवारीची..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:42 IST

महापालिकेतील महापौरपदाचे आरक्षण खुल्या गटासाठी निघाल्याने सत्ताधारी भाजपसह विरोधकांकडून मोर्चे बांधणीस प्रारंभ झाला आहे. यासाठी निष्ठावान की बाहेरून आलेल्यास प्राधान्य, अशी चर्चा सत्ताधाऱ्यांमध्ये असतानाच संभाव्य महाशिव आघाडीही आपल्या परीने कामास लागली आहे.

नाशिक : महापालिकेतील महापौरपदाचे आरक्षण खुल्या गटासाठी निघाल्याने सत्ताधारी भाजपसह विरोधकांकडून मोर्चे बांधणीस प्रारंभ झाला आहे. यासाठी निष्ठावान की बाहेरून आलेल्यास प्राधान्य, अशी चर्चा सत्ताधाऱ्यांमध्ये असतानाच संभाव्य महाशिव आघाडीही आपल्या परीने कामास लागली आहे.महापौरपदासाठी भाजपकडून अनेक जण इच्छुक आहेत. त्यातील काहीजण पक्षातील ज्येष्ठत्व कर काहीजण सर्व गणिते जुळवण्याच्या दृष्टिकोनातून सक्षम असल्याचा दावा करतात. सध्या माजी सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे आणि सतीश कुलकर्णी यांची नावे चर्चेत आहेत. यातील उद्धव निमसे यांच्याकडे सध्या स्थायी समितीचे सभापतिपद असताना त्यांना भाजप संधी देण्याबाबत साशंकता आहे. माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातूननिवडणूक लढविण्यासाठी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तयारी आरंभली होती. मात्र, पक्षाने त्यांना थांबण्यास सांगितल्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि सीमा हिरे यांच्या प्रचारात झोकून देऊन काम केले होते. त्यावेळी त्यांना पक्षाने महापौरपद कबूल केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांचीदेखील तयारी आहे. तर पक्षातील निष्ठावान आणि ज्येष्ठत्वाच्या निकषावर सतीश कुलकर्णी यांचे नाव चर्चेत आहे. पक्षात अन्य काही पक्षांतून आलेल्या आयारामांचा विधानसभा निवडणुकीत लाभ होऊ न शकल्यामुळे निर्माण झालेली नाराजी बघता मूळ पक्षातील उमेदवार द्यायचे ठरल्यास कुलकर्णी यांचे नाव पुढे येईल. याखेरीज पक्षाकडे इच्छुकांची मोठ्या प्रमाणात रांग लागणे शक्य असून, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने गणिते जुळवू पहात आहे.राज्यातील सत्तासमीकरणांप्रमाणे नाशिक महापालिकेत महाशिव आघाडीचे गणित जुळल्यास शिवसेनेकडेदेखील अनेक जण इच्छुक आहेत. त्यात माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी असलेले त्यांचे सख्य पाहता त्यांच्या नावाविषयी चर्चा आहेच, परंतु नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही त्याचवेळी त्यांना राऊत यांनी महापौरपदाचा शब्द दिल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारण