शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आता झाडे लावल्यानंतरच मिळणार पूर्णत्वाचा दाखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:47 IST

शहरात वृक्षलागवड करण्यासाठी पर्यावरणप्रेमी झटत असताना दुसरीकडे मात्र बांधकाम करण्याच्या नावाखाली वृक्षतोडदेखील होते. बांधकाम करण्यासाठी सुरक्षिततेच्या नावाखाली एका प्लॉटवर पत्रे ठोकून आत झाडे तोडली जातात.

नाशिक : शहरात वृक्षलागवड करण्यासाठी पर्यावरणप्रेमी झटत असताना दुसरीकडे मात्र बांधकाम करण्याच्या नावाखाली वृक्षतोडदेखील होते. बांधकाम करण्यासाठी सुरक्षिततेच्या नावाखाली एका प्लॉटवर पत्रे ठोकून आत झाडे तोडली जातात. या प्रकाराच्या विरोधात आता महापालिकेचा उद्यान विभाग सरसावला असून, आता बांधकाम करण्याच्या जागी तर पाहणी केली जाईलच, परंतु त्याचबरोबर तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात नवीन वृक्षलागवड केली आहे किंवा नाही हे तपासूनच पूर्णत्वाचा दाखला देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येणार आहे.गेल्या काही वर्षांत नाशिक शहरात रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड हा वादाचा विषय होता. दरम्यान, महापालिकेने अलीकडील काळात वृक्षतोडीस मर्यादा घालताना सहा विभागांत देवराई फुलविण्याचे काम हाती घेतले आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक प्रभागात देवराई साकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे ही धावपळ सुरू असताना दुसरीकडे मात्र बांधकाम करण्याच्या नावाखाली सर्रास वृक्षतोड होते. एखाद्या प्लॉटवर बांधकाम करताना महापालिकेचा नगररचना विभाग परवानगी घेतो, परंतु त्याचवेळी वृक्षलागवडीसंदर्भात अनामत रक्कम घेतली जाते. परंतु एकदा बांधकाम  करणे सुरू झाल्यानंतर किती झाडे तोडली आणि एकास पाच अशी झाले लावली काय असे काहीच तपासले जात नाही. संबंधितांच्या वृक्षतोडीकडे आणि नव्याने वृक्षलागवण्याकडे कोणाचेही लक्ष नसते. संबंधित मिळकतधारकदेखील पूर्णत्वाचा दाखला घेऊन मोकळा होतो, परंतु नवीन झाडे लावले किंवा नाही तेच तपासले जात नाही.महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने मात्र आता यासंदर्भात वृक्षप्राधीकरण समितीमार्फत मोठा निर्णय घेतला जाणार आहे. बांधकामास परवानगी देण्यापूर्वी त्या प्लॉटवर किती झाडे आहेत आणि त्यामुळे एका वृक्षाच्या बदल्यात किती झाडे लावावी लागणार याबाबत संंबंधितांना कळविले जाईल. त्याचप्रमाणे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरदेखील प्रत्यक्षात संबंधित मिळकतधारकाने झाडे लावले आहे किंवा नाही याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच पूर्णत्वाचा दाखला दिला जाईल. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर वृक्ष प्राधीकरण समितीवर यासंदर्भात प्रस्ताव आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक