शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:26 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतरही जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्णातील दोन हजारांहून अधिक ग्रामपंचायत सदस्यांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतरही जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्णातील दोन हजारांहून अधिक ग्रामपंचायत सदस्यांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या असून, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास या सर्वांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे.लोकप्रतिनिधी कायद्यान्वये राखीव जागेवर निवडणूक लढविणाºया उमेदवाराने निवडणुकीत नामांकन दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून, जात वैधता पडताळणीसाठी समितीकडे दिली असेल तर त्याबाबतची पावती नामांकनासोबत जोडणे क्रमप्राप्त आहे. अशा उमेदवाराने राखीव जागेवर निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत समितीकडून जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करून ते निवडणूक अधिकाºयाकडे सुपूर्द करणे अनिवार्य असून, तसे न करणाºया उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्याची कायदेशीर तरतूद आहे. या तरतुदीला कोल्हापूर जिल्ह्णातील काही सदस्यांनी थेट उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर आॅक्टोबर महिन्यात राज्य सरकारने जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया सदस्यांचे सदस्यत्व रद्द ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र अशा सदस्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याची बाब निदर्शनास आली.सरकारने मुदतवाढ देऊनही जिल्ह्णात सुमारे दोन हजारांहून अधिक ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा सर्व सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द का करू नये, अशा नोटिसा प्रशासनाने बजावल्या आहेत.राज्य मंत्रिमंडळाने ३१ मार्च २०१६ नंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांना बारा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे व ११ आॅक्टोबर २०१८ पूर्वी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या सदस्यांना ते निवडणूक अधिकाºयाकडे सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक