शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

आंदोलकांना नोटिसा : मोबाइल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:10 IST

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी संघटनांच्या नेत्यांना नोटिसा बजावण्याबरोबरच त्यांचे मोबाइल कंपन्यांकडून त्यांच्या मोबाइलची सेवाच बंद केली आहे़

नाशिक : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी संघटनांच्या नेत्यांना नोटिसा बजावण्याबरोबरच त्यांचे मोबाइल कंपन्यांकडून त्यांच्या मोबाइलची सेवाच बंद केली आहे़ पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली असली मराठा संघटनांच्या हुशार नेत्यांनी दुसरे सीमकार्ड घेऊन मोबाइल सुरू केला आहे़  मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू झाले असून, काही ठिकाणी या आंदोलनास हिंसक वळण लागले़ यामध्ये बसेस, ट्रक व वाहनांची तोडफोड व जाळपोळ केली़, तर काही ठिकाणी मराठा संघटना शांततेत रास्ता रोको वा आंदोलने करीत आहेत़ शहरात वा ग्रामीणमध्ये कायदा व्यवस्थेचा  प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला आहे़ याबरोबरच शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत़  शहरातील मराठा संघटनाचे प्रमुख नेत्यांना पोलिसांनी यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत़ केवळ नोटिसांवरच पोलीस थांबलेले नसून या नेत्यांचे मोबाइल नंबरही संबंधित मोबाइल कंपन्यांना कळवून ते बंद करण्यात आले आहेत़ या नेत्यांचे मोबाइलनंबर डायल केल्यानंतर तो नंबरच लागत नाही, तसेच त्यांनाही कुणाला फोन करता येत नाही़ केवळ फोनच नव्हे तर त्यांचा सोशल मीडियाही ब्लॉक करण्यात आला आहे़ यामुळे या नेत्यांनी संपर्कात राहण्यासाठी दुसरे कार्ड घेण्याचा पर्याय निवडला आहे़१४९ ची नोटीसनाशिक शहरातील सकल मराठा क्रांती मोर्चाद्वारे नाशिक शहर व परिसराचे नेतृत्व करीत आहात़ शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडून शांतता भंग होईल, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, आंदोलनातील कार्यकर्ते वा सामान्य नागरिकांना इजा होईल, असे कृत्य करू नये अथवा होऊ देऊ नये, कृत्य करण्यास प्रोत्साहित करू नये, चिथावणी देऊ नये वा भडकवू नये़ असे कृत्य केल्यास आपणाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या नोटिसीत म्हटले आहे़

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPoliceपोलिस