देवळा : राज्यभरात शनिवारपासून (दि. २३) प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर देवळा शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात प्लॅस्टिकबंदी अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सोमवारी शहरातील सर्व व्यावसायिकांना नगरपंचायतीच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.राज्य सरकारने पर्यावरणाला घातक ठरणाºया प्लॅस्टिक, थर्माकोल आदीपासून तयार होणाºया व एकदाच वापरल्या जाणाºया वस्तूंच्या वापरावर व उत्पादनावर बंदी घातली आहे. नियमभंग केल्यास पहिल्या वेळी पाच हजार रुपये, दुसºया वेळी दहा हजार, तर तिसºया वेळी पंचवीस हजार रुपये दंड व तीन महिने कैदेची तरतूद आहे. देवळा शहराच्या सौंदर्यास बाधक होती. नगरपंचायत प्रशासनाने प्लॅस्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलली असून, शहरातील सर्व व्यावसायिकांना प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्याबाबत नोटिसा बजावून नियमभंग करणाºयावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
देवळ्यात व्यावसायिकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:36 IST
देवळा : राज्यभरात शनिवारपासून (दि. २३) प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर देवळा शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात प्लॅस्टिकबंदी अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सोमवारी शहरातील सर्व व्यावसायिकांना नगरपंचायतीच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
देवळ्यात व्यावसायिकांना नोटिसा
ठळक मुद्देकारवाई : प्लॅस्टिकबंदी अभियान; नगरपंचायत प्रशासन सज्ज