शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या पोलिसांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 05:47 IST

लोकसभा निवडणुकीसाठी लागणारे पोलीस बळ, संवेदनशील मतदान केंद्रे व भरारी पथकासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका येत्या दोन दिवसांत करण्याचेही ठरले.

नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पडण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी यापूर्वी निवडणूक प्रक्रियेत बाधा आणणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबच सराईत गुन्हेगारांचे तडीपाराचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेला दिल्या. लोकसभा निवडणुकीसाठी लागणारे पोलीस बळ, संवेदनशील मतदान केंद्रे व भरारी पथकासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका येत्या दोन दिवसांत करण्याचेही ठरले.लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, आयकर अधिकारी व सर्व निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंंद्राचा अभ्यास करून त्यात संवेदनशील व व्हर्नाबेल मतदान केंद्रे शोधून अशा मतदान केंद्राची सेक्टर अधिकारी, तहसीलदार व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्या मतदान केंद्राच्या सुरक्षिततेचा आढावा घ्यावा त्याचबरोबर त्या ठिकाणी किती व कसा बंदोबस्त देता येईल याची माहिती गोळा करण्याचे ठरविण्यात आले.गेल्या निवडणूक काळात समाजकंटकांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती घेण्यात आली. किती लोकांना समन्स बजावले, तडीपार व प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्यांवर यंदा बारीक लक्ष ठेवण्याचे व त्यांना नोटिसा बजावण्याचे ठरविण्यात आले. निवडणूक काळात बेकायदेशीर दारूचा साठा, विक्री व वाटप केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची माहितीही घेण्यात येऊन, सीमा चेक नाका, बेकायदेशीर पैशांचे वाटप करण्याचे प्रकाराबाबत जागरूक राहण्याचे ठरविण्यात आले. जिल्हास्तरीय बैठकीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांची बैठक घेऊन त्यात विभागाचा आढावा घेण्यात आला.माहिती सादर करण्याच्या सूचनामतदान केंद्रनिहाय पोलीस बंदोबस्त, मतपेट्या, स्ट्रॉँग रूमच्या बंदोबस्तासाठी लागणारे बळ, केंद्रीय पोलीस दल, होमगार्डची संख्या याची माहितीही गोळा करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत जिल्हा निवडणूक कार्यक्रमावर चर्चा करून निवडणूक अधिकाºयांनी सेक्टर आॅफिसर, मतदान केंद्रांचा रूट, कम्युनिकेशन प्लॅन, मतदान केंद्राची तयारी याबाबत आढावा घेण्यात आला. मतदानाशी संबंधित काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांची नावानिशी माहिती सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliceपोलिस