शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील एक हजार धोकादायक घरांना नोटिसा ; मनपाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 18:59 IST

पावसाळा सुरू झाल्यानंतर एक वाडा कोसळून दुर्घटना घडल्याने महापालिकेने तातडीने दुर्घटनेची दखल घेत शहरातील एक हजारांहून अधिक धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या आहेत. अर्थात, कोरोना संसर्ग वाढत असताना अशा प्रकारे घरातून स्थलांतरित तरी कोठे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

ठळक मुद्देशहरातील एक हजारांहून अधिक धोकादायक घरांना नोटिसागेल्या तीन वर्षांपासून प्रश्न प्रलंबितवाडा कोसळून दुर्घटना घडल्याने महापालिकेची कारवाई

नाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर एक वाडा कोसळून दुर्घटना घडल्याने महापालिकेने तातडीने दुर्घटनेची दखल घेत शहरातील एक हजारांहून अधिक धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या आहेत. अर्थात, कोरोना संसर्ग वाढत असताना अशा प्रकारे घरातून स्थलांतरित तरी कोठे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  शहरात गावठाण भागाचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गावठाणात जुनी घरे आणि वाडे आहेत. अनेक वर्षांपूर्वीची हे वाडे धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाडे पडतात आणि प्रसंगी जीवितहानीदेखील होते. गेल्यावर्षी सुमारे २५ ते ३० वाडे पडले होते. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच एक धोकादायक घर पडले आणि आणि एकाचा बळीदेखील गेला आहे. त्यानंतर महापालिकेने आता धोकादायक वाडे हा विषय पटलावर घेतला असून, धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याचे काम वेगाने पूर्ण केले आहे.  महापालिकेच्या वतीने शहरात एक हजार ३२ घरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात सर्वाधिक म्हणजेच ५०८ घरे पश्चिम भागातील आहेत, तर जुन्या नाशकातील काझी गढीवरील ८३ जणांनादेखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय पंचवटीत १८०, नाशिकरोड येथे १२८, पूर्व १०५, सातपूर ७०, सिडको विभागात ४१ याप्रमाणे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधितांना धोकादायक भाग उतरवून घेणे तसेच घर सोडून अन्यत्र स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले आहे. तथापि, सध्या कोरोनाची स्थिती बघता नागरिक घर सोडून अन्यत्र कोठे जाऊ शकतील याविषयी साशंकता आहे. 

क्लस्टरचा प्रश्न प्रलंबितचशहरातील गावठाण भागातील वाड्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाने क्लस्टर योजना राबविण्याचे ठरविले आहे. मात्र, हा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. महापालिकेचा आघात मूल्यमापन अहवाल वेळेत न पोहोचल्याने क्लस्टरचा विषय मार्गी लागलेला नाही. त्यामुळे नोटिसा बजावणे ठीक; परंतु महापालिकेनेदेखील गावठाणांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्लस्टरला चालना द्यावी, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHomeघर